देश -जगबीड

भारत-पाक युद्धाच्या पाशर्वभुमी वर बीड पोलीसांचे आवाहण

Beed Police appeal to the public against the backdrop of the Indo-Pak war

भारत- पाकीस्तान युध्दाच्या अफवाबाबत स्पष्टता व नागरीकांसाठी सुचना ! अफवांवर विस्वास न ठेवता सतर्क राहावे !.बीड पोलीसांचे आवहान

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड (दिनांक-9 मे 2025 ,बीड)–पाकीस्तान पुरस्कृत दहशतवादयांनी पहलगाम येथे दिनांक 22/04/2025 रोजी केलेल्या भ्याड हल्याचा भारताने निषेध केला आहे., पाकीस्तान मधील नागरी वस्तीची सुरक्षीतता अबाधीत ठेवुन ऑपरेशन सिंदुर राबविले आहे त्यामध्ये दहशतवादी तळ उधवस्त केले आहेत

त्यामुळे पाकिस्तान सिमावर्ती भागात हल्ले करत आहे. भारताकडुन त्यांचे सर्व हल्ले सक्षमपणे हाणून पाडण्यात भारतास यश येत आहे.

परंतु तरीसुध्दा पाकिस्तानकडुन भारतामध्ये काही अफवां पसरवुन गोंधळाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सोशल मिडीया हॅक करुन खोटया अफवा पसरविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या अनुषंगाने सर्व नागरीकांना खालील मुद्दयावर बीड पोलीस दलातर्फे अहवान करण्यात येत आहे!

01) भारत एक संघ आहे, सर्वांना भारत एकसंघ असल्याची प्रचिती दाखवण्यासाठी एकजुटीने आपले देशाप्रतीचे कर्तव्याचे पालन करावे,

02) अफवांवर विश्वास ठेवु नका, कोणतीही माहिती केवळ अधिकृत शासकिय स्त्रोतांकडुनच स्विकारा.

03) सोशल मिडियावर चुकीच्या माहितीचा प्रसार करु नका अफवा पसरवणे कायदयाने दंडनीय आहे.

04) सोशल मिडियाचा वापर करताना अनोळखी, संशयास्पद लिंकवर क्लीक करु नये.

05) सोशल मिडीयाची काळजीपुर्वक हाताळणी करावी.

06) लष्करी, निमलष्करी दलाच्या हालचालीबाबत काहीही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सोशल मिडियावर व इतरत्र माहिती प्रसारीत करु नये.

07) स्थानिक प्रशासनाच्या सुचनेचे पालन करा. शाळा, कार्यालये, वाहतुक याबाबत बदल झाल्यास प्रशासन माहिती देईल.

08) कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलीस किंवा प्रशासनाशी त्वरीत संपर्क साधावा.

09) नागरीकांना जातीय सलोखा राखण्यासाठी सर्व स्थरावर प्रयत्न करावेत, कोणतीही जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करु नये.

10) भारत एक मजबुत आणि सजग देश आहे. नागरीकांनी शांतता राखावी, संयम बाळगावा आणि देशाच्या सुरेक्षेसाठी जागरुक राहावे.

11) बीड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष, येथे 02442-222333 या क्रमांकावर संपर्क साधावा.

जाहिराती साठी संपर्क -KESHAV D MUNDE 8888 387 622 WEGWAN MARATHI PARLI

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!