क्राईमबीड

परळी येथील कुख्यात गैंगवर मोकोका अंतर्गत मोठी कारवाई

Major action under MOCCA against notorious gang in Parli

परळी तालुक्यातील तडोळी येथील सहदेव सातभाई यांच्या फिर्यादी वरुण परळी शहरातील माणिक नगर,राम नगर,शिद्धार्थ नगर,बजरंग नगर व नंदागौळ येथील गुंडांवर मोक्का व एमपीडीए लावण्यात आला आहे..

© मुख्य आरोपी टोळी प्रमुख नामे रघुनाथ रामराव फड वय 30 वर्ष रा. रामनगर ता. परळी जि. बीड यास दिनांक 07/03/2025 रोजी अटक केली.

® तसेच गुन्ह्यातील आरोपी क्र. 2) जगन्नाथ विक्रम फड़ वय 45 वर्ष रा. बजरंग नगर परळी वै. जि. बीड. 3) सुदिप रावसाहेब सोनवणे वय 28 वर्ष रा. सिध्दर्थ नगर परळी वै. जि. बीड. 4) बालाजी अंकुश दहीफळे वय 24 वर्ष रा. माणिक नगर परळी वै. जि. बीड. 5) विलास बालाजी गिते वय 27 वर्ष रा. नंदागौळ ता. परळी वै. जि. बीड. यांना दिनांक 28/03/2025 रोजी 20.34 वा. अटक करुन तपास करण्यात आला

© व सदर गुन्ह्यातील 02 आरोपी 1) धनराज ऊर्फ राजेभाऊ श्रीरंग फड वय 32 वर्षे रा. कन्हेरवाडी ता परळी जि. बीड (सदस्य) 2) ग्यानदेव ऊर्फ गोट्या मारोती गित्ते वय 31 वर्षे रा. नंदागौळ ता परळी जि बीड ह.मु. बैंक कॉलनी परळी वैजनाथ जि बीड फरार आहेत.

परळी व अंबाजोगाई भागात दहशत निर्माण करुन धुमाकुळ घालणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का कायद्य अंतर्गत मोठी कारवाई.

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड-11/में/2025-  बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित  राखण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुन्हेगारीचे व गुंडगिरीचे समूळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MCOCA व MPDA व कलम 55,56,57 मपोका अन्वये बन्ऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचा धडाका बीड जिल्हाचे पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली बीड पोलीसांनी सुरु ठेवला आहे.

जनतेच्या जिविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी जिल्हयात चोन्या, दरोडे, घरफोडया, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडयाची तयारी, बलात्कार, जुलुमाने मालमता घेणे, पळवून नेणे, खंडणी मागणे

या व अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द ठोस कारवाई करण्यासाठी बीड जिल्हयातील पोलीस जिल्हयातील व जिल्हाचे बाहेरील गुन्हेगारावर करडी नजर ठेऊन आहेत.

दिनांक 01/03/2025 रोजी मा. न्यायालयाचे आदेशान्वये पो.स्टे. परळी शहर गुरनं 44/2025 कलम 307,326,392,394,323,324,504,506,34 भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयातील फिर्यादी नामे सहदेव वाल्मीक सातभाई वय 28 वर्षे व्यवसाय शेती रा तडोळी ता परळी जि. बीड

सहदेव सातभाई हे दिनांक 18/10/2023 रोजी दुपारी 04.30 वाजता तडोळी येथुन परळी वै. येथे ट्रॅक्टरचे काम करण्यासाठी व हप्ता भरण्यासाठी घरतुन 2,70,000/- रुपये घेवुन मोटार सायकलवर परळी येथील शिवाजी चौकामधुन सातबारा आनण्यासाठी जलालपुर रोडवरली तलाठी कार्यालयाकडे मोटार सायकलने जात असतांना

जलालपुर रोडच्या कमानीजवळ मोटार सायकल . समोर पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ MH 44 20806 आडवी लावली..

नंतर आरोपी रघुनाथ फड व ईतर 7 ते 8 जण असे सर्व जण बेळुच्या काठ्या व लोखंडी रॉड घेवुन खाली उत्तरले व फिर्यादीस गाडीवरुन ओडुन खाली पाडले व रघुनाथ फड म्हणाला की, याला मारा याला सोडु नका भडवा लई माजला आहे असे म्हणाला

त्यावेळ ईतर आरोपीतांनी फिर्यादीस खाली पाडुन तोंडावर पाठीवर काठीने सपासप मारहाण करून जखमी केले व लोखंडी रॉडने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर मारले त्यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाला त्यावेळी आरोपीने फिर्यादीस फरशी उचलुन जिवे मारण्याचे उद्देशाने मारहाण केली.

यात फिर्यादीचा डावा पाय फॅक्चर झाला. त्यावेळी रघुनाथ फड व इतरांनी फिर्यादीचा मोबाईल व पॅन्टच्या खीशातील 2,70,000/- रुपये रोख काढुन घेतले फिर्यादी जोरजोरात ओरडल्याने जमाव जमला.

तेंव्हा आरोपी स्कॉर्पिओ गाडीतुन निघुन गेले. जातांना म्हणाले की, तु आता वाचलास परंतु नंतर आम्ही तुला जिवंत सोडणार नाहीत अशी धमकी देवुन निघुन गेले वगैरे मचकुराचे फिर्याद वरुन सदरचा गुन्हा CrPC कलम 156(3) अन्वये मा. न्यायालयाचे आदेशाने दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचे तपासात परळी शहर पोलीसांनी आरोपींचा बारकाईने शोध घेवुन सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी टोळी प्रमुख नामे रघुनाथ रामराव फड वय 30 वर्ष रा. रामनगर ता. परळी जि. बीड यास दिनांक 07/03/2025 रोजी अटक केली.

तसेच गुन्ह्यातील आरोपी क्र. 2) जगन्नाथ विक्रम फड वय 45 वर्ष रा. बजरंग नगर परळी वै. जि. बीड. 3) सुदिप रावसाहेब सोनवणे वय 28 वर्ष रा. सिध्दर्थ नगर परळी वै. जि. बीड. 4) बालाजी अंकुश दहीफळे वय 24 वर्ष रा. माणिक नगर परळी वै. जि. बीड. 5) विलास बालाजी गिते वय 27 वर्ष रा. नंदागौळ ता. परळी वै. जि. बीड,

यांना दिनांक 28/03/2025 रोजी 20.34 वा. अटक करुन तपास करण्यात आला व सदर गुन्ह्यातील 02 आरोपी फरार आहेत.

सदर टोळी ने आज पावेतो संघटीतरीत्या पो. स्टे. परळी शहर, संभाजीनगर व अंबाजोगाई ग्रामीण हद्दीत एकुण 10 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यात खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, दंगा करणे, कट रचणे, अवैध शस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे, दरोडा टाकणे, रस्ता आडवीणे, मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आनने, गंभीर दुखापत करणे या सारखे गंभीरस्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

प्रस्तावात एकुण 10 गुन्हे विचारात घेण्यात आले. त्यापैकी 09 गुन्हयांची दखल न्यायालयाने घेतलेली असुन 01 गुन्हा पोलीस तपासावर आहे.

सर्व गुन्हे 10 वर्षाच्या आतील असुन 03 वर्षापेक्षा जास्त शिक्षेस पात्र आहेत, सदर टोळीचा टोळी प्रमुख याने स्वतःच्या व टोळीतील इतर सदस्यांच्या आर्थीक फायदयासाठी सदरचे गुन्हे केल्याचे पोलीस अधीक्षकांच्या चानाक्ष नजरेतुन लपुन राहोले नाही.

त्यावरुन बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचने वरून सदर प्रकरणांत तपासी अधिकारी पोनि रघुनाथ नाचण पो.स्टे. परळी शहर यांनी अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई व उपविपोअ अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली सदर टोळी विरुध्द मोक्का कायद्या अंतर्गत प्रस्ताव तयार करून दिनांक 29/04/2025 रोजी पोलीस अधीक्षकांना सादर केला होता,

पोलीस अधिक्षक, श्री नवनीत कौवत यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन दिनांक 04/05/2025 रोजी प्रस्ताव आपले शिफारशी सह मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांना सादर केला होता.

मा. श्री. विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन दिनांक 07/05/2025 रोजी नमूद संदभीव गुन्हयांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 मधील कलमांचा अंतर्भाव करण्याची परवानगी दिल्याने

पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर प्रकरणांचा पुढील तपास श्री. अनिल चोरमले, उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबाजोगाई यांचेकडे दिला आहे व मोक्का कायदयाचे कलम 3(1), 3(2).3 (4) समाविष्ठ करणे बाबत आदेशीत केले आहे.

त्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई हे सदर गुन्हयांचा पुढील तपास करीत आहेत. सदर प्रकरणांत ०। आरोपी अटक असून 02 आरोपी फरार आहेत.

पोलीस त्यांच्या शोधात आहेत. तसेच नमूद गुन्हातील मा. न्यायालयाकडून जामीन मंजुर झालेल्या 04 आरोपींचे जामीन रद्द करण्यासाठी तपास अधिकारी यांनी प्रस्ताव मा. न्यायालयात सादर केले आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल चोरमले, पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख, स्वागुशा बीड, यांचे मार्गदर्शनाखाली

पोनि श्री रघुनाथ नाचण, सपोनि योगेश शिंदे पो.अं. पंडीत पांचाळ, धनश्री भताने, किशोर घटमळ पो. स्टे. परळी शहर तसेच सपोउपनि अभिमन्यु औताडे, निलेश ठाकुर, विभीषण चव्हाण स्थागुशा बोड यांनी केली आहे.

भविष्यातही शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार व गुन्हेगारांच्या टोळयावर व कायद्याला न जुमानणाऱ्या व्यक्ती विरुध्द तसेच बीड जिल्ह्यात धुमाकुळ घालणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का व एम.पी. डी.ए. कायदया अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनित कौवत यांनी दिले आहेत.

जाहिराती साठी संपर्क – केशव डी मुंडे वेगवान मराठी महाराष्ट्र 8888 387 622 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!