शेती

महाराष्ट्राची श्रीलंका देशात कांदा निर्यातीला सुरुवात exporting onions

वेगवान मराठी / साहेबराव ठाकरे

नाशिक, ता. 11 दोन वर्षापासून कांद्याला चांगल्या प्रमाणात भाव मिळत आहे आणि याचाच परिणाम म्हणून शेतक-यांना चांगला पैसा मिळला. मात्र मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान कांद्यावर निर्यात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे कांद्याचे भाव थोडे फार कमी झाले होते. मात्र कांद्याचे भाव 3000 पेक्षा कमी विकले गेले नाही. आता तर नाशिकचे कांदे दुस-या देशात जाण्यासाठी निर्यात खुली केल्यामुळे आता यंदा कांदा शेतक-यांचे नशीब घडविणार आहे.

महाराष्ट्रात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन हे नाशिक जिल्ह्यामध्ये घेतले जाते.  नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुका कांद्याला प्रथम महत्व देतो. कांद्यामुळे अनेक शेतक-यांचे नशीब पालटले आहे. लोक कांद्याला टर्ले म्हणून हिनवत असले तरी हेच टर्ले शेतक-यांना चांगल्या चांगल्यांच्या पंगतीला नेऊन बसवतात. एक काळ होता द्राक्ष बागयतदरांना मोठं मानले जात होते. मात्र कांद्याचे भाव एवढे आहे की कांदा उत्पादक शेतकरी द्राक्ष पिकवणा-यांना कधीचं मागे टाकून पुढे निघून गेले आहे.

ता. चांदवड जि.नाशिक
बुधवार दि.11/12/2024 चे बाजारभाव
—————————————
शेतमालाचे | किमान |कमाल | सरा
नाव | भाव | भाव | भाव
🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅
👉 कांदा लाल=1500-4551-3360
👉 लाल (गोल्टा/गोल्टी)=611-3010-2350
कांदा लिलाव झालेली वाहने
जीप-458 ट्रॅक्टर-195एकुण-653

गेल्या 17 नोव्हेंबर ला बांगलादेशाने कांद्यावरील 10 टक्के निर्यात शुल्क कमी केले. त्यानंतर 1 डिसेंबर 2024 ला श्रीलंकेने पण त्यांच्यावरील 30 रुपये असलेला काद्यावरील दर कमी करुन तो 10 रुपये किलो केल्यामुळे आज लासलगाव येथून श्रीलंकेसाठी कांदा लोडींग सुरु झाली आहे.

बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली असल्यामुळे कांदा दुस-या देशात पाठविणे सोपे होणार असून शेतक-यांना यामुळे चांगला पैसा मिळणार आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये 30 हजार क्विंटलची आज आवक झाली आहे. हीच अवक पुढे 40 ते  50 हजार क्वि्टल इतकी होणार आहे.

भारताचा निर्यात शुल्क जो 20 टक्के शिल्लक आहे तो जर कमी झाला तर कांदे चार चॅांद तोडल्या शिवाय राहणार नाही. कांद्याचे भाव किरकोळ बाजारामध्ये 100 रुपये किलोवर जाऊन पोहचला असला तरी स्थानिक होलसेल बाजारपेठेत कांद्याचे भाव मात्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!