बीडराजकारण

बीड मधिल त्या भ्रष्टाचाराच्या चौकशी साठी या 3 जनांची समिती

Corruption in Beed's planning committee will be probed

पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा–2023-24 आणि 24- 25 च्या जिल्हा नियोजन समिती प्रशासकीय मान्यतेची होणार चौकशी

तीन सदस्यीय चौकशी समितीचे पथक गठीत; एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

वेगवान मराठी बीड -दिनांक-3 फेब्रुअरी 2025  बीड जिल्हा नियेाजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव झाला या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता…

याबाबत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे..

नियोजन समितीची बैठक होताच आता 2023-24 आणि 2024-25 सालच्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची सर्वकष चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक गठीत करण्यात आले आहे.

यामध्ये धाराशिवचे उप जिल्हाधिकारी संतोष भोर हे अध्यक्ष असतील तर अर्थ आणि सांख्यिकी संचलनालय अपर संचालक एम.के.भांगे व जालना जिल्हा नियोजन अधिकार सुनिल सुर्यवंशी यांचा या चौकशी पथकात समावेश आहे.

हे पथक मंजूर झालेल्या कामांची सद्यस्थिती, त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश तसेच प्रशासकीय मान्यता दिलेली कामे, त्याकरिता निधी वितरण याची चौकशी करुन

एका आठवड्यात हा अहवाल सादर करावा असे आदेश राज्याचे अवर सचिव सुषमा कांबळी यांनी दिले आहेत

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!