क्राईमबीडमहाराष्ट्र

ठेवीदारांनो कुटुंबाला संकटात सोडुण जिव देऊ नका-सेवकराम जाधव

Don't risk your life by leaving your family members in the open, Sevakram Jadhav appeals to depositors

!! ठेवीदारांनो खचून जाऊ नका आपले अमूल्य जीवन संपवू नका !! आपल्या लेकरा बाळांना उघड्यावर पाडू नका – ठेविदारांचे नेते सेवकराम जाधव यांचे आवाहण

परळी वैजनाथ  19 जुन 2025 वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड 

दि- 18 जुन 2025 बुधवार रोजी पहाटे गेवराई येथे छत्रपती मल्टी स्टेटच्या दारात ज्ञानराधा मल्टीस्टेट व छत्रपती पतसंस्थेचे ठेवीदार सुरेश जाधव यांनी आपले जीवन संपवले. रस्त्यावर आलेली माऊली, लग्नाला आलेली मुलगी, शिक्षण घेणारा मुलगा यांची काय चूक, या कुटुंबाचं पुढे काय होणार ?

ठेवीदारांनो माझी आपणास कळकळीची विनंती आहे खचून जाऊ नका, टोकाचे पाऊल उचलू नका, आपल्या लेकरा बाळांना उघड्यावर पाडू नका.तुम्हीच जर आसे एक एकजन साथ सोडुण जात असाल तर मग आम्ही लढायचे कोणासाठी ? व कशासाठी असे भावनिक आवाहन ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष सेवकराम जाधव यांनी सर्व ठेवीदारांना केले आहे.

मल्टी स्टेट संचालकांना लाजा वाटल्या पाहिजेत. महापुरुषांच्या नावाने संस्था काढून लोकांना फसवायचं, त्यांचा जीव घ्यायचा यांना कोणी अधिकार दिला ?

संबंधीत पतसंस्थेच्या संचालक मंडळासह अध्यक्षांवर संगठीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 मकोका अंतर्गत कारवाई बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत करतील का ?

सरकारला आणखी किती मुदडे पडलेले बघायचे आहेत. अशा फसव्या संस्था चालकांना कठोरात कठोर शिक्षा देण्याचा कायदा झाला पाहिजे. नसता विनाकारण अनेक निष्पाप लोकांचे बळी जाणार आहेत.

बीड जिल्ह्यात असंख्य मल्टी स्टेट बंद पडल्या असून ठेवीदार आत्महत्या करत आहेत. हे प्रशासन व सरकार उघड्या डोळ्याने निमूटपणाने पाहत आहे. अंमलबजावणी शून्य पदावर असून पालकमंत्री महोदयांना हे माहित नसेल का ?

प्रत्येक गोष्टीचे निवेदनच दिले पाहिजे असे काही आहे का ? नाही तरी ठेवीदारांची शेकडो निवेदने शासन दरबारी रद्दी सारखी पडून आहेत. त्याचं पुढे काय झालं हा सवाल आ वासून उभा आहे.

कर्तव्य दक्ष आणि कायद्याचे कठोर अशी ख्याती असलेले उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार बीड जिल्ह्याला पालक म्हणुन लाभले आहेत

त्यांच्या कडे अर्थ खाते आहे सहकार मंत्री देखील त्यांच्याच पक्षाकडे आहे ते आमच्यासाठी नक्कीच काही तरी करतील ही भाबडी अशा ठेवून बीड जिल्ह्यातील सर्व ठेवीदार चातका प्रमाणे वाट बघत आहेत.

ठेवीदारांच्या प्रश्नावर कोण पुढे येईल न येईल आपणास आपले हक्काचे पैसे मिळवायचे आहेत. ठेवी मिळणार नाहीत तोपर्यंत ठेवीदारांचा लढा सुरूच राहणार आहे.

करीता सर्व ठेवीदारांना एक कळकळीची विनंती आहे. खचून जाऊ नका, टोकाचे पाऊल उचलू नका,

आपले अमूल्य जीवन संपवू नका, आपल्या लेकरा बाळांना दुःखाच्या खाईत लोटू नका. असे भावनिक आवाहन सेवकराम जाधव यांनी केले आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!