महाराष्ट्र

महाराष्ट्रातील या भागास आपात्कालीन केंद्रा कडुण अरेंज अलर्ट

Emergency Centre issues alert for this part of Kaduna state

कोकण किनारपट्टीला २५ जून रोजीचे रात्रौ ८-३० पर्यंत उंच लाटांचा इशारा

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

वेगवान मराठी प्रतिनिधी बीड  मुंबई, दि. २३ :–  कोकण किनारपट्टीला आज सायंकाळी ५-३० पासून दिनांक २५ जून २०२५ रोजीचे रात्री ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.  लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२३ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) पालघर जिल्ह्यात ७३.३ मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६.४,  रत्नागिरी जिल्ह्यात २५.८ मिमी, ठाणे जिल्ह्यात १४.३  आणि कोल्हापूर जिल्ह्यात १३.९ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २३ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  १४.३, रायगड १०.७, रत्नागिरी २५.८,  सिंधुदुर्ग ३६.४, पालघर ७३.३, नाशिक ६.२, धुळे ०.५, नंदुरबार २.९, जळगाव ०.९, अहिल्यानगर ०.२, पुणे ४.३, सोलापूर ०.१,  सातारा ४.७,  सांगली २.८,  कोल्हापूर १३.९, छत्रपती संभाजीनगर १, जालना १.१, धाराशिव ०.२, नांदेड ०.३, हिंगोली ०.४, बुलढाणा १.१, अकोला ३.४, वाशिम ०.४ अमरावती ०.५, यवतमाळ ०.६, वर्धा ०.२, नागपूर १.५, भंडारा ०.६, गोंदिया १.७, चंद्रपूर २.५ आणि गडचिरोली जिल्ह्यात ६.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात पुरात वाहून एक व खड्यामध्ये बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुणे जिह्यात नदीत वाहून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे दरम्यान मागील आठवड्यात बीड जिल्ह्यत पावसाची नोंद झालेली नाही 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहेत. सामाजिक, शैक्षणिक राजकीय,गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये उप संपादक आणि बीड जिल्ह्य प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!