वंजारी सेवा संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित
Former MLA Shri Govind Anna Kendra unanimously elected as the National President of Rashtriya Vanjari Seva Sangh

राष्ट्रीय वंजारी सेवा संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माजी आमदार आदरणीय श्री गोविंद अण्णा केंद्रे यांची सर्वानुमते निवड…

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे -यादगिरीगुट्टा,तेलंगणा – दिनांक 22 जून 2025 रोजी यादगिरीगुटा तेलंगणा राज्य या ठिकाणी वंजारी समाजाची राष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेला देशभरातील 7 राज्यातून समाज बांधव उपस्थित होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी यजमान म्हणून अमरपेट हैदराबादचे आमदार वेंकटेश कालेरू हे होते.
बैठकीत देशभरातील समाज बांधवांच्या विविध समस्या तसेच भविष्यातील वाटचालीवर चर्चा करण्यात आली. समाजाच्या विविध प्रश्नावर या परिषदेत ठराव मांडण्यात आले.
ज्याला सर्वानुमते मान्यता मिळाली त्यानंतर राष्ट्रीय वंजारी सेवा संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

वंजारी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माजी आमदार गोविंद आण्णा केंद्रे यांची तर राष्ट्रीय मार्गदर्शक म्हणून माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ.भागवत कराड यांच्या नावाची घोषणा झाली.
तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी माजी आमदार आदरणीय संजयभाऊ दौंड व आमदार व्यंकटेश कालेरू यांच्याकडे तर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी तेलंगणा येथील ज्येष्ठ समाजसेवी रामोजी अण्णा कालेरु यांच्या कडे सोपवण्यात आली.
यावेळी वंजारी सेवा संघाचे राज्यभरातील पदाधिकारी यांच्यासोबत माजी आमदार तोतारामजी कायंदे, माजी आमदार नारायणरावजी मुंडे,
MIT समूहाचे कार्यकारी प्रमुख डॉ राजेश कराड, सौ.अंजली भागवत कराड, धुळ्याचे महापौर मा.प्रदीप करपे, भगवान गडाचे ट्रस्टी मा. राजेंद्रजी राख, वंजारी सेवा संघाचे संस्थापक राहुल जाधवर, वंजारी सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मानसिंगराव माळवे,
प्रदेश कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे, प्रदेश महासचिव बाजी दराडे, सरचिटणीस बिबीशन पाळवदे, वंजारी संघम तेलंगणाचे अध्यक्ष नरेश कलेरू, कंडारी व्यंकटेशम, अमरेंद्र कालेरु,
सामाजिक कार्यकर्त्या सुशीलाताई मोराळे, डॉ मंजुषा दराडे, सौ. सविताताई मुंडे, दिनकर पाटील शेप, उर्फ डी के पाटील गोवा,
मा.अरुणजी खरमाटे, संजय काळबांडे, विजयालक्ष्मीजी यांच्यासह सात राज्यातून आलेले वंजारी सेवा संघाचे प्रमुख समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांच्या उपस्थितीत वंजारी सेवा संघ यांच्या वतीने सर्वसंमतीने बैठकीत ठरल्यानुसार मला व्यासपीठावर सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली
यापुढील काळात या सर्व राष्ट्रीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील वंजारी समाजाला एकत्रित करण्याचे भरीव काम करण्यात येईल.
यासोबतच वंजारी समाजाचा इतिहास व भूगोल या विषयावर मंथन करून सर्व समाजासमोर काही बाबी मांडण्यात येणार आहेत.
✒️ केशव डी मुंडे, उप-संपादक वेगवान मराठी मिडीया समुह महाराष्ट्र 8888 387 622 परळी वै.


केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.







