परळी पोलीसांचा अजब कारभार सुरुच ! चोराला सोडुण संन्याशाला फाशी
!! Parli hangs monk, leaving thief behind!! Parli city police's strange and wonderful work!!

!! परळीत चोर सोडून संन्याशाला फाशी !! परळी शहर पोलिसांचा अजब गजब कारभार !!
दिनांक 23 जुन – वेगवान मराठी – (प्रतिनिधी केशव डी मुंडे ) परळी . महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये गुटखाबंदीचा आदेश काढलेला असतानाही परळी शहरात खुलेआम गुटखा विक्री होत आहे तर बीडचे अन्न भेसळ अधिकारी परळी कडे फिरकत सुद्धा नसल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे परळी शहर पोलिसांनी गुटखा पकडला आसता वेगळीच गाथा समोर येत आहे ति आशी
परळी शहर पोलिसांनी दुचाकीवरुन विक्रीसाठी नेण्यात येणारा ४६ हजार ८०५ रुपयांचा गुटखा परळी शहर पोलिसांनी १८ जून रोजी पकडला. परंतु अन्न भेसळ अधिकारी भोसले यांच्याकडे वेळ नसल्याने तीन दिवसांनंतर २१ जून रोजी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहर व परिसरात गुटख्याची खुलेआम सर्रासपणे विक्री होत असल्याने पोलिसांकडून सातत्याने गुटखा पकडला जातो. १८ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता वैद्यनाथ मंदिरासमोरील रस्त्यावर दुचाकीवरुन विक्रीसाठी नेण्यात येत असलेला ४६ हजार ८०५ रुपयांचा गुटखा पकडला.
सदरील गुटख्याची तपासणी व मोजदाद अन्न व भेसळ विभागाकडून होत असते मात्र १८ जून रोजी पकडलेल्या या गुटख्याची तपासणी करण्यास अन्न भेसळ अधिकारी भोसले यांना वेळ नसल्याने परळी शहर पोलिसांनी वरिष्ठांच्या परवानगीने २१ जून रोजी अनंत मुजांजी फले (रा. गंगासागर नगर), अजिज उर्फ अजिम हैदर कुरेशी, अनिस यासिन खान (रा. परळी) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. परळी शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची विक्री होत आहे. यावर कारवाईची मागणी नागरीकां कडुण करण्यात येत आहे.
मोठी कारवाई केल्याचं वरिष्ठांना भासविण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातील संभाजीनगर हद्दीमधील एका किरकोळ पानपटटी धारकावर कारवाई करून पकडलेल्या मुख्य गुटखा माफियाला त्याच्याकडुण चिरीमिरी घेऊन सोडुण दिल्याची चर्चा परळी शहरात पसरली आहे
संबंधित गुटखा माफीयास अंदाजे पाच ते सात तास परळी पोलीस ठाण्यात बसवुण ठेवण्यात आले होते आशी माहिती समोर येत आहे
विशेष म्हणजे सदरील गुटखा माफिया परळी शहर पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये कैद झालेला आहे तरी देखील परळी पोलीसांनी मुख्य गुटखा माफिया सोडून दिल्याची चर्चा परळीतील नागरीकां मध्ये झाल्यामुळे
परळी पोलीसांनी मुख्य आरोपी कडुण चिरीमिरी घेऊण तोडपाणी करत सदरील प्रकरण दडपवण्यासाठी एका सामान्य गरीब पानपटी धारकावर थातुरमातुर कारवाई करण्यात आली आहे
याकडे बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनी संबंधित चिरीमिरी घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी परळीकरांची मागणी आहे
तसेच या मागील खरे गौडबंगाल काय अशी ही चर्चा परळी मध्ये सुरू आसुण या घटणेचे सत्य समोर यायला पाहीजे.अन्यथा सामान्य जनते चा परळी च्या पोलीसांवर थोडा बहुत असलेला विश्वास देखील राहणार (नाही) नाही

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








