
मृताच्या नावे बनावट दास्ताऐवज करून जमीन हडपण्याचा प्रयन्त.
मुलाची पोलिसांत धाव; सिरसाळा पोलिसांकडून 59 दिवसांनी कार्यक्षेत्रा बाहेरील मुद्दा म्हणत ‘समजपत्र’ जारी.
मयत शेतकऱ्याचा पिडीत मुलगा अक्षय 👇

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे परळी वैजनाथ बीड दि. 11 जुलै 2025 : परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस स्टेशन हद्दीतील अक्षय माणिक मुंडे ( रा.कोयाळ, ता धारूर ह.मु. पुणे) यांनी आपल्या वडिलांच्या नावे बनावट कागपत्रे तयार करून जमीन हडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. वडिलांच्या निधनानंतर जमीनीची वारस नोंदणी करण्यासाठी तलाठी कार्यालयात गेल्यानंतर अक्षय मुंडे यांना हा प्रकार समजला.
काय आहे नेमके प्रकरण आणि कोण आहेत या प्रकरणातील शातीर तेज दिमागवाले मास्टरमाइंड 👇
अक्षय मुंडे यांच्या तक्रारीनुसार, त्याचे वडील माणिक नारायण मुंडे यांचे 17 फेब्रुवारी 2025 रोजी निधन झाले. त्यानंतर गट नं. 123 मधील 00 हे 29 आर जमिनीच्या वारस नोंदीसाठी ते गेले असता, तालठ्याने त्यांच्या वडिलांच्या जमिनीवर आक्षेप अर्ज आल्याचे सांगितले.
चौकशीअंती धक्कादायक माहिती समीर आली; त्यांच्या वडिलांच्या नावे 10 जानेवारी 2025 या खोट्या तारखेला 500 रुपयांचा बनावट बॉण्ड पाथरी जी परभणी येथून खरेदी करण्यात आला होता,
ज्यावर खोटी स्वाक्षरी होती. यांनतर 20 जानेवारी 2025 ला याच बॉण्डवर अनिता यशवंत मुंडे रा कोयाळ या महिलेच्या नावे 6 लाखांची इसारपावती ( करारनामा ) तयार करण्यात आली.
यात 5 लाख अक्षयच्या वडिलांना देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. विशेष म्हणजे, मृत वडिलांच्या श्रद्धांजलीच्या बॅनर वरील फोटो एडिट करून या बनावट करारनाम्यावर लावण्यात आला होता.
माजलगाव येथील नोटरी वकील विलास बी राठोड यांच्या संगलमताने 20 जानेवारी 2025 ला परत खोटी सही करून नोटरी करण्यात आल्याचा आरोप अक्षय यांनी केला आहे.
24 एप्रिल 2025 ला अनिता यशवंत मुंडे हिने तलाठी व दुय्यम निबंधक कार्यलयात अर्ज दाखल करून, या बनावट इसारपावती आधारे जमीन आपल्या नावावर करण्याची मागणी केली.
अक्षय मुंडे यांच्या मते, त्यांच्या वडिलांची सही अशी नव्हती व 10 जानेवारी रोजी ते तेलगाव येथील साखर करण्यात दिवस भर ड्युटीवर होते. आणि पाथरीला बॉण्ड खरेदीसाठी गेलेच नव्हते.
त्यांच्या वडिलांना फक्त स्वतःचे नाव लिहिता येत होते. आडनाव नाही. तर बॉण्डवर आडनावासहित सह्या आहेत.
याप्रकरणी अक्षय मुंडे यांनी अनिता यशवंत मुंडे, प्रेमकुमार मुरलीधर खाडे, नोटरी वकील विलास बी राठोड आणि बॉण्ड विक्रेता शेख ए एन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती
पण पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल न करता अक्षय मुंडे यांनाच समजपत्र दिले आहे. त्यामुळे पीडित हे हतबल झालेलं असून त्यांनी धारूर कोर्ट कडे न्याय मागितला आहे.
सदर प्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे पण अक्षय यांनी दाद मागितली असता 1 मे 2025 ला नवनीत कवात यांनी अक्षय यांना 14 दिवसांमध्ये पोलीस तपास करतील आसे आश्वासन दिले होते
मात्र सदर प्रकरण हे फौजदारी स्वरूपाचे असताना सुद्धा सिरसाळा पोलीस यांनी विषय बदलून माझ्यावर अन्याय केला आहे असे अक्षय मुंडे यांचे म्हणणे आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








