पंढरपुर प्रमाणे परळी मध्ये हि श्रावणा निमित्य मांसविक्रीवर बंदी घालावी- दता महाराज परळीकर
Stop this meat sale in Parli on the lines of Pandharpur - Data Maharaj Parlikar

श्रावणात महिनाभर मांस विक्रीवर बंदी घालण्यात यावी.ॲड.दत्तामहाराज आंधळे
(वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे ) पोषणशास्त्रात मांसाहारींना सर्वभक्षी असेही म्हणतात. मांसाहार हा वारकरी संप्रदायाने निषिद्ध मानला असून देशातील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे परळी तीर्थक्षेत्र विख्यात आहे.देश विदेशातील भाविक दर्शनासाठी येथे येतात.
त्यामुळे मांसविक्रीवर बंदी घालावी अशी मागणी
संतवाड्.मयाचे संशोधक ह. भ.प. ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केली आहे.
शिवभक्तांची श्रद्धा तसेच उपवास ,साधनेचा पवित्र महिना आहे.तेव्हा संपूर्ण श्रावण महिनाभर
मांस विक्रीवर बंदी घालण्यात यावी .
आषाढी यात्रेच्या काळात पंढरपूर तीर्थक्षेत्रात महाराष्ट्र शासनाने दहा दिवस याबाबत मांसविक्रीवर बंदी घातली होती.पंढरपूरचे धरतीवर परळी वैजनाथ येथे पण बंदी घालण्यात यावी अशी आग्रही मागणी दत्ता महाराज परळीकर यांनी केली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








