
कैम्प परळी वैजनाथ कार्यालय जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-। सहकारी संस्था, बीड यांचे कडुण दि 9 /7/ 2025 रोजी संचालकांवर गुन्हे दाखल करण्या बाबतचे परळी शहर पोलीस निरीक्षकांना पत्र
केशव डि मुंडे वेगवान मराठी प्रतिनिधी परळी दिनांक 2 अगस्ट 2025,👇प्रति- पोलीस निरीक्षक,पोलीस ठाणे परळी शहर जि. बीड , विषय :- गुन्हा नोंद करुन घेणे बाबत.रिपोर्ट :- सतिष काकासाहेब पोकळे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था, बोड
उपरोक्त विषयानुसार की, मी सतिष काकासाहेव पोकळे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था, बीड या पदावर कार्यरत असुन राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, परळी वैजिनाथ ता. परळी वैजिनाथ जि. बीड या संस्थेमध्ये एकुण 13,26,86,221/- रुपयाचे झालेल्या अपहार/फसवणुकीचा संचालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यासाठी मला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बीड यांचे आदेश जा.क्र.1086 लेप/विशेष- अह/राजस्थनी ना. पत/2025 दिनांक 26 मार्च 2025 अन्वये प्राधिकृत केले असून या पत्रासोबत संबंधीत तक्रारीबाबतची सर्व कागदपत्रे सोबत जोडलेली आहेत.
तरी राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, परळी वैजिनाथ ता. परळी वैजिनाथ जि.बीड य संस्थेच्या संचालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करावा.
सोबत :- 1. फिर्याद
2. प्राधिकृत केले बाबत आदेश
3. लेखापरीक्षण अहवाल
परीक्षक वर्ग १.स दोष लेखा 1
जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांच्याकडून राजस्थानी पत संस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करणे बाबत परळी ठाण्यात अर्ज
जिल्हा विशेष लेखापरीक्षक सतीश काकासाहेब पोकळे यांच्या लेखा परीक्षणात राजस्थानी पत संस्थेच्या संचालक मंडळा कडून 13,26,86,221/ रुपयाचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे.
या संस्थेचे संचालक व व्यवस्थापक यांच्यावर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, त्याकरिता शहर पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ येथे दिनांक 9/7/2025 रोजी अर्ज करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करणे बाबत परळी ठाण्यात अर्ज प्राप्त होऊण 22 दिवस उलटले तरी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री नाचन हे गुन्हे दाखल करुण घेण्यास टाळम टाळ,म्हणजे टोलवा टोलवी करताना दिसत आहेत
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांचे आदेश जा. क्र.1086 लेप/विशेष-अह/राजस्थानी ना. पत/ 2025 दिनांक 26 मार्च 2025 अन्वये प्राधिकृत केले असून
या पत्रासोबत लेखा परीक्षण अहवालासह संबंधित तक्रारी बाबतची सर्व कागदपत्रे जोडली असल्याचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांच्याकडून नमूद करण्यात आले आहे.
मात्र काही ठेवीदारांनी पोलीस स्टेशन कडे चौकशी केली आसता आज रोजी पर्यंत पोलीस यंत्रनेकडून गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे…
✒️केशव डि मुंडे -वेगवान मराठी नेटवर्क महाराष्ट् 8888 387 622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








