क्राईमबीड

जिल्ह्यत डिजे पथकास प्रमीशन नौट !! परळीसह या तालुक्यातील डिजे मालकांवर कारवाया

DJ team strictly banned in Beed district!! No permission at all

29/08/2025 बीड जिल्ह्यात डीजे चा परवानगी नाहीच केवळ 2 दिवसात आठ कारवाया…

डिजे च्या साहित्यासह वाहन देखील करत कारवाई चा बडगा दाखवल्यांने डिजे मालकांचे धाबे दणानले

केशव डी मुंडे वेगवान मराठी 29 आगस्ट 2025 -दिनांक  27/08/2025 रोजी संपूर्ण राज्यासह बीड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणेशात्सवास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवापूर्वीच बीड पोलीसांनी सर्व नागरीकांना विविध माध्यमांतून डीजेचा वापर करु नये अशा सुचना दिल्या होत्या. तरीही काही उत्साही गणेश भक्तांनी व गणेश मंडळांनी गणपती आगमनावेळी बेकायदेशीर डीजे लावून मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन ध्वनीप्रदुषण करीत असल्याचे निदर्शनास आले. परंतु बीड पोलीसांनी असे डीजे जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.

दिनांक 27/08/2025 रोजी पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीतील स्वराज्य नगर भागात डिजे चालक बबनराव रामराव कुडुके रा. तितरवणी ता. शिरूर जि. बीड हे त्यांचे वाहन क्र. एम. एच. 10 झेड 2437,

त्याचप्रमाणे स्वराज्यनगर भागातच डि.जे चातक विवेक रवी पंदे रा. नेकनूर ता.जि. बीड हे त्यांचे वाहन क्र.एम.एच. 16 क्यु 1021, तसेब माने कॉप्तका भागात

डीजे बातक बाळासाहेब रघुनाथ तांदळे वाहन क्र. एम.एच.04 बी.पु.4593 व मित्रनगर चौक येथे डीजे चालक अंगद धोंडीबा तांदळे वाहन क्र. एम.एच. 10 ब्रेड 2437 असे सर्व डीजे गणपती आगमन मिरवणूकीत वाजवत असल्याचे पोलीसांना माहीती मिळताच पोलीसांनी तात्काळ सदर ठिकाणी जावून खात्री केली असता

सर्व डिजे चालक हे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ध्वनीप्रदुषण करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीसांनी सर्व डीजे बंद करुन ताब्यात घेवुन पोलीस ठाणे येथे आणून लावले असुन त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली आहे.

त्याचप्रमाणे बीड शहर पोलीस स्टेशन हद्दीत माळीवेस ते महात्मा फुले चौक या रस्त्यावर सायंकाळ 09.00 वाजेच्या सुमारोस डीजे मालक नाव प्रशांत नवनाथ वाघ वप 26 वर्ष राहणार रजापूर तालुका जामखेड जिल्हा अहील्यानगर त्याचे वाहन क्रमांक MH20 AT 2394 Tata 909 गणपती आगमन मिरवणूकीत डीजे वाजवत असल्याची पोलीसांना माहीती मिळताच पोलीसांनी तात्काळ सदर ठिकाणी जावून खात्री केली असता

डीजे चालक हे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन ध्वनीप्रदुषण करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीसांनी सर्व डीजे बंद करून ताब्यात घेवुन पोलीस ठाणे येथे आणुन सावले असुन त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली आहे.

तसेच दिद्रुड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे आनंदगाव ता. माजलगाव येथे गणपती स्थापने करिता जपदीप अशोक तांगडे रा. गौतमनगर माजलगांव याने त्याचे मालकीचा डीजे वाहन टाटा 407 क्र. MH 17 K 7902 वाजवीत असत्याची पोलीसांना माहीती मिळताब पोलीसांनी तात्काळ सदर ठिकाणी जावून खात्री केली असता

डीजे चालक हे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ध्वनीप्रदुषण करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीसांनी सर्व डीजे बंद करून ताब्यात घेवून पोलीस ठाणे येथे आणून लावले असुन त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली आहे.

परळी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत मौने हेळंब येथे डीजे मालक ऋषीकेश विलास मुंडे रा. वानटाकळी ता. परळी हा त्याचे डीजे वाहन क्रमांक एम.एव 44 7695 वर डीजे वाजवीत असत्याची पोलीसांना माहीती मिळताच पोलीसांनी तात्काळ सदर ठिकाणी जावून खात्री केली असता

डीजे चालक हे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ध्वनीप्रदुषण करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीसांनी सर्व डीजे बंद करुन ताब्यात घेवुन पोलीस ठाणे येथे आणून लावले असून त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली आहे.

त्याचेप्रमाणे काल दिनांक 28/08/2025 रोजी पोलीस स्टेशन अंबाजोगाई ग्रामीण हद्दीतील मौजे घाटनांदूर ता. अंबाजोगाई येथे अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणूकीमध्ये डिजेचा आवाज मोठा करून वाजवून मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन ध्वनीप्रदुषण करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने

डीजे क्रमांक MH12 GT 2951 चा मालक प्रविण बातासाहेब कराड वय 30 वर्षे रा. घाटनांदूर ता. अंबाजोगाई व जयंती उत्सवाचे अध्यक्ष सुरज नारायण ताटे वप 32 वर्षे रा. घाटनांदूर ता. अंबाजोगाई पांच्यावर पोलीसांनी कायदेशीर कारवाई केली असून नमूद डिजे पोलीस स्टेशनला आणून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

वरील कारवायांमुळे डीजे चालक मालकांचे धाबे दणाणले असुन बीड पोलीस आता डीजेवर कारवाईच करणार आहे.

पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेले सर्व डीजेचा अहवाल उपप्रादेशीक परीवहन अधिकाऱ्यांकडे पाठवीला जाणार असून उपप्रादेशीक परीवहन अधिकाऱ्यांकडून डीजेवर दंडात्मक कारवाया केल्या जाणार आहेत.

सदरची कारवाई वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, शितलकुमार बल्लाळ, मजहर सय्यद, मुरलीधर खोकले सपोनि महादेव ढाकणे यांनी व अंमलदारांनी केली आहे.

“सर्व गणेश भक्त, गणेश मंडळांनी जल्लोषात गणेशोत्सव साजरा करावा परंतु गणेशोत्सव साजरा करतांना ध्वनीप्रदुषण, लाऊड स्पीकर वाजवण्याबाबतचे मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे व ध्वनी प्रदुषण कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची नागरीकांनी दक्षता घ्यावी,

त्याचे उल्लंघन झाल्यास वबीड पोलीसांकडून कारवाईत कसूर केली जाणार नाही.” असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी केले आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!