बीड अपहरण कांडातील आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश
Police succeed in arresting the accused in the kidnapping case that took place in Beed

अपहरण केलेल्या ईसमाची 14 तासात सुटका करुण आरोपी केले जेरबंद
बीड ग्रामीण पोलीसांची कारवाई.आरोपींचे नावे मात्र गुलदस्त्यात
!! पोलीस आधिक्षक नवनीत काँवत आल्यापासुण बीड पोलीस कात टाकत आहे !!
केशव डि मुंडे वेगवान मराठी दि 13 स्पटेंबर 2025 बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 12/09/2025 रोजी साय.05.00 वा. सुमारास कल्याणनगर चहऱ्हाटा फाटा बीड येथे यातील फिर्यादी दिया नागनाथ नन्नवरे वय 25 वर्षे रा. गोरे वस्ती बालेपीर, बीड हिचे पती नामे नागनाथ चंद्रकांत नन्नवरे वय 30 वर्षे यास 8 ते 10 जनांनी हाताने, लाकडी दांड्याने मारहान करुण एका पांढऱ्या रंगाचे बोलेरो गाडीत टाकुण अपहरन करुण घेवुन गेले आहेत. अशी तक्रार दिली होती.
सदरची तक्रार हि गंभीर स्वरूपाची असल्याने तात्काळ बीड ग्रामीण ठाण्याचे दोन पथक नेमण्यात आले व एक स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले
सदर पथक यांनी वेगवेळया ठिकाणी जावून आरोपी बाबत माहिती घेवुन तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन बाबत सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्यात आले
तपासादरम्यान सदरचा गुन्हा आरोपी सोनल काळे व ज्योती काळे यांनी पैशाचे कारणावरुन इतराचे मदततीने केला असल्याची माहिती मिळाल्याने त्याबाबत अदिक तपास करुन आरोपीचा कसोसीने शोध घेतला असता
गुन्ह्यातील आरापी हे आंबी पोलीस ठाणे (धाराशीव) हद्दीत असल्याचे माहिती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी स्थानीक पोलीसांचे मदतिने पोउपनि कुकलारे व टीम यांनी आरोपीताना ताव्यात घेण्यात आले असुन आरोपीचे ताब्यात पिडीत याची 14 तासात सुखरूप सुटका करण्यात आली आह.
आरोपीमध्ये 6 पुरूष आरोपी 1 महिला आरोपी असुन त्यामध्ये 3 विधी संर्घष्य गृस्त बालक आहेत यातील काही आरोपीवर यापुर्वीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोउपनि/कुकलारे हे करत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री. नवनीत काँवत पोलीस अधीक्षक बीड, मा.श्री. सचिन पांडकर अ.पो.अ.बीड, मा.श्री.बाळकृष्ण हानपुडे पाटील उप.वि.पो.अ.बीड यांचे मार्गदर्शनाखाली मारूती खेडकर पोलीस निरीक्षक, सपोनि बाळराजे दराडे, पोउपनि
संजय कुकलारे, पोउपनि नितीन काकरवाल, सफौ भाऊसाहेब गुंड, सुंदर चव्हाण, पोह जगदिश करांडे, मनोज जोगदंड, फिरोज पठाण, सतिष मुंडे, प्रसाद कदम, पो. अं. सचिन कापसे, गणेश कांदे सर्व नेमणुक बीड ग्रामीण
तसेच पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि/खटावकर, सोमनाथ गायकवाड, आंनद मस्के, राहूल शिंदे, यादव, सिध्दार्थ मांजरे, मनोज परझणे, आसपाक शेख सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








