
म्हैस चोरास परळी पोलीसांनी घेतले ताब्यात अनेक गुन्ह्यात समावेश असल्याने इतर ही प्रकरणातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
वेगवान मराठी केशव डी मुंडे परळी प्रतिनिधी फिर्यादी नामे सलीम बेग लाल बेग वय 50 वर्ष रा. ब्रह्मवाडी ता. परळी वै यांनी दि.24/06/2025 रोजी पो.स्टे.ला फिर्याद दिली की, त्यांची 35,000/-रुपये किमतीची म्हैस दि.23/06/2025 रोजीचे 13:00 वा. सुमारास ब्रह्मवाडी शिवारातुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे,
अशा मजकुराचे फिर्यादवरुन अज्ञात आरोपीविरुध्द गु.र.नं.283/2025 कलम 303(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
फिर्यादी नामे विष्णु ज्ञानोबा मुंडे वय 52 वर्ष रा. जिरेवाडी ता. परळी वै यांनी दि.25/06/2025 रोजी पो.सटे.ला फिर्याद दिली की, त्यांची 40,000/-रुपये किमतीची म्हैस दि.18/03/2025 रोजीचे 19:00 वा. ते दि.19/03/2025 रोजीचे 05:00 वा.
दरम्यान जिरेवाडी बायपासचे पानवंत नावाचे शेतातुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे, अशा मजकुराचे फिर्यादवरुन अज्ञात आरोपीविरुध्द गु.र.नं.288/2025 कलम 303(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरचे दोन्ही गुन्हे दाखल झालेचे अवघ्या काही तासात पो.नि एम.ए. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि आर.एस.शेख, पोउपनि ए.डी. निमोणे, स. फौ.204 एल.बी. टोले, पो.हे.कॉ. 1829 एन.डी. हरगावकर, पोकों 1550 एस.पी. अन्नमवार, चा.पो.कॉ. 1952 एम.डी. वाघमारे यांनी आरोपी नामे सोमनाथ मारोती गित्ते वय 36 वर्ष रा. नंदागौळ ता. परळी वै जिल्हा बीड यास ताब्यात घेऊन
त्याच्याकडुन वर नमुद दोन्ही गुन्हयात चोरीस गेलेल्या दोन्ही म्हैस हस्तगत केल्या असुन आरोपी नामे सोमनाथ मारोती गित्ते यास दोन्ही गुन्हयात अटक करुन मा. न्यायालयाचे समक्ष हजर करण्यात आले आहे.
सदरची कारवाई श्री. नवनित काँवत साहेब पोलीस अधिक्षक बीड, व श्रीमती चेतना तिडके मॅडम अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








