राजकारण

Eknath Khadse एकनाथ खडसेंनी शरद पवारांची राष्ट्रवादी का सोडली ?

वेगवान मराठी न्यूज

मुंबई, 6एप्रिल 2024 –  Eknath Khadse : राज्याच्या राजकारणात मोठी धक्कादायक घडामोड घडणार आहे. एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार अशा चर्चांना उधाण आले होते. त्यावर गिरीश महाजन आणि रक्षा खडसेंनी सूचक प्रतिक्रिया दिली होती. एकनाथ खडसेंचा संपर्क थेट वरच्या लोकांशी आहे, ते खालच्या लोकांशी संपर्क ठेवत नाहीत..

त्यामुळे आपल्याकडे त्यांच्या प्रवेशाबद्दल माहिती नाही.. असा टोला गिरीश महाजनांनी लगावला. तर जोपर्यंत घटना घडत नाहीत तोपर्यंत त्यावर बोलून काहीच उपयोग नाही असं रक्षा खडसे म्हणाल्या.

उद्या कोठे गारपीट तर कोठे पाऊस :हवामान अंदाज घ्या जाणून

2020 साली भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश

दि. 23 ऑक्टोबर 2020 रोजी एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्ठी देत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. शरद पवारांनी मला जर राष्ट्रवादीत घेतले नसते तर माझे राजकीय करिअर संपले असते, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते.

 

भाजपात का जाणार खडसे

एकनाथ खडसें राष्ट्रवादी का सोडणार…हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत आहे. याचे कारण अनेक आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये जी फुट पडली आहे त्यामुळे खडसे यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी मध्ये भविष्य दिसतं नाही.

राष्ट्रवादी मध्ये दोन गट पडल्यामुळे भाजपाचे पुढील दिवस चांगले दिसत असल्याचा दृष्टीकोन

देशातील मोदींचे वर्चस्व लक्षात घेता. शरद पवार राष्ट्रवादी मध्ये त्यांना मोठी अडचण होणार आहे. लोकसभा निवडणूकीत स्थानिक राजकारणातील अडचणी यामागे असू शकतात.

भाजपामधील एक मोठ्या नेत्याने एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपा आणण्यासाठी थेट दिल्लीत जावून प्रयत्न केल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपात येणार असं बोललं जातयं. पण जळगाव जिल्ह्यातील गिरीष महाजन यांना हा प्रवेश मात्र झोंबणार आहे. कारण या दोघांचे नाते विळ्या भोपळ्यासारखे आहे.

Sahebrao Thakare

साहेबराव ठाकरे हे वेगवान मराठीचे संपादक म्हणून सध्या काम पाहत आहे. गेली 25 वर्षापासून पत्रकारितेमध्ये सक्रिय. सकाळ टिव्ही 9 मराठी सह इतर वर्तमानपत्रामध्ये विविध विषयांवर रिपोर्टींग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!