
(घाटनादुर गावात अंमली पदार्थ गांजा विक्रेत्यावर छापा टाकुन १२ किलो १८६ ग्रॅम गांजा जप्त)
वेगवान मराठी केशव डि मुंडे दि 8 औक्टोंबर मा.पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चटन करणे बाबतचे आदेश दिलेले आहेत, त्यावरुन पोलीस निरीक्षक स्था.गु.शा., बीड यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मौजे घाटनादुर ता. अंबाजोगाई जि. बीड गावातील इसम नामे निहाल रामभाऊ गंगणे वय 30 वर्षे हा त्याच्या राहत्या घरामध्ये अंमली पदार्थ गांजा बेकायदेशिररित्या साठवून जवळ बाळगुन त्याची चोरटी विक्री करीत आहे.

मा. पोलीस अधीक्षक सो बीड श्री. नवनीत कौवत, मा. अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, सह पोह/837 गोविंद राख, पोह/1429 रामचंद्र केकान, पोह/989 बाळु सानप, पोह/1837 दिलीप गिते, पोना/1918 भताने सर्व नेमणुक स्थागुशा बीड व
अंबाजोगाई ग्रामिण पोस्टेचे प्रभारी अधिकारी श्री. खोकले, सफो 950 मुंडे, पोह/395 देशमाने, मपोह/1644 थोरात, पोअ/852 सोळंके, असेनी मिळुन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन दि.07.10.2025 रोजी 19.00 वाचे सुमारास छापा मारला असता.
सदर ठिकाणी आरोपी नामे निहाल रामभाऊ गंगणे वय 30 वर्षे रा.मोंढा विभाग, रेल्वे पटरी जवळ घाटनादुर ता. अंबाजोगाई जि. बीड
निहाल गंगणे याच्या घरामध्ये बेकायदेशिर रित्या 12 किलो 186 ग्रॅम गांजा किमंती 2,43,720 रूपयाचा अंमली पदार्थ गांजा विक्री करण्यासाठी जवळ बाळगतांना मिळुन आला आहे.
म्हणून त्याचे विरूध्द पोस्टे अंबाजोगाई ग्रामिण येथे गुरन. 334/2025 कलम 8 (क), 20 (ब) एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार आणि पोस्टे अंबाजोगाई ग्रामिणचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.


केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








