क्राईमबीड

बीडच्या ओबीसी मेळाव्यात पाकिट आणि मोबाईल चोरी करणारा जाधवांचा आशोक पकडला

Ashok Jadhav, who stole wallet and mobile phone at Minister Chhagan Bhujbal's OBC gathering, caught

!! बीड येथील ओबीसी महा एल्गार सभेतील लोकांचे पाकिटमारी व मोबाईल चोराच्या 24 तासात आवळल्या मुसक्या !!

|| दोन रात्रीच्या घरफोडया. बस स्टॅन्ड मधील दोन चोऱ्या. एक साखळी चोर व सभेमधील एक चोरी असे एकूण 06 गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.||

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड दिनांक 18 /10/25 मा. पोलीस अधीक्षक बीड यांनी बीड जिल्हयामध्ये घरफोडया व चोऱ्या करणाऱ्या इसमांची माहीती काढून कारवाई करण्याचे आदेशित केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले होते.

दिनांक 18.10.2025 रोजी गुप्त बातमीदार मार्फत माहीती मिळाली की माजलगांव शहर पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी पिताजीनगरी येथील बंद घर व तुळजाभवानी नगर येथील पत्राचे शेडचे दरवाजा तोडुन रात्रीचे वेळी दोन घरफोडया अमिर उर्फ लंगडा लाला जहागिरखॉन पठाण, रा ढगे कॉलणी बीठ व आयान अस्तम शेख रा अजिजपुरा बीड पा दोघांनी मिळून केल्याचे तांत्रिक विश्लेषणातून समोर आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याचे मागावर असताना गुप्तबातमी मिळाली की त्यापैकी आयान शेख हा बीड मध्ये माने कॉम्पेक्स जवळ उभा आसताना

पोलीसांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने छापा मारुन आयान शेख पकडले व त्याचे कडुन गुन्हयात चोरी गेलेल्या सोने चांदी व नगदी पैकी 7000 रु नगदी मिळुन आले त्याचे कडुन खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.

1) पोलीस ठाणे माजलगांव भाहर गु.र.नं 340/2025 कलम 331 (4), 305(ए) बी.एन.एस 2) पोलीस ठाणे माजलगांव शहर गु.र.नं 324/2025 कलम 331 (4), 305 (ए) बी.एन.एस

आरोपी आयान शेख यास पुढील तपासकामी पोलीस ठाणे माजलगांव शहर यांचे ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे. गुन्हयातीत दुसरा आरोपी अमिर उर्फ लंगडा ताला जहागिरखॉन पठाण, रा ढगे कॉतणी बीड हा बीड कारागृहात आहे.

तसेच दिनांक 14.10.2025 रोजी गेवराई येथील फिर्यादी महीला हि गेवराई येथील बसस्टॅव्हमध्ये शेवगांव येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात आरोपीने त्याचे गळयातील सोन्याचे तकिट काटुन घेतले होते तसा पोलीस ठाणे गेवराई येथे गुन्हा नोंद करण्यात आता होता.

सदरील माहीती स्थागुशा पथकास मिळताच त्याने तपासाचे चक्रे फिरवून बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने आरोपी मनोज उर्फ शरदया महादेव बहौरवाळ, वय 19 वर्ष, रा माउती नगर, नाळवंडी नाका, बीड यांनी केल्याचे निष्पन्न करुन त्याचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की तो परत चोरी करण्यासाठी बीड येथील बसस्थानक जवळ फिरत आहे,

सदरील ठिकाणी तात्काळ पथकाने तेथे जावून त्यास पकडले व त्याचे ताब्यातून चोरीस गेलेती सोन्याची चैन हस्तगत केली आहे. त्याचे गुन्हा केल्याचे सिध्द झाले आहे. त्याचे कडून खालील गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस

ठाणे गेवराई 614/2025 कलम 303(2) बी.एन.एस

आरोपी व मुददेमाल पुढील तपासकामी पोलीस ठाणे गेवराई यांचे ताब्यात देण्यात आला असुन पुढील तपास

गेवराई पोलीस करीत आहे.

तसेच दिनांक 17.10.2025 रोजी छत्रपती संभाजी महाराज बीड येथे ना.छगन भुजबळ यांच्या ओबीसी महाएल्गार सभेमधील गर्दीच्या ठिकाणी गर्दीधा फायदा घेवुन तेथील एका ईसमाचा मोबाईल व नगदी काढून घेणारा ईसम हा जिल्हा परीषद कार्यालय बीड समोरील ठिकाणी थांबला असल्याची माहीती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आरोपी नितीन अशोक जाधव, वय 30 वर्ष, रा. गांधी नगर, नाळवंडी रोड, बीड पास पकडून चोरीस गेलेला मोबाईल व नगदी रक्कम हस्तगत केले आहे.

तसेच त्यास चौकशी करता त्याने ईतर आनखीन दोन ठिकाणी चोरी केल्याचे कबुल केले.

त्याने बीड व माजलगांव बसस्टॅन्ड मधुन देखील गर्दीच्या ठिकाणाहून दोन वेगवेगळ्या ईसमांचे नगदी पैसे खिश्यातून गर्दीचा फायदा घेवुन काढून घेतल्याचे कबुल केले आहे त्याचे कडून खालील प्रमाणे पोलीस ठाणेचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

1) पोलीस ठाणे बीड शहर गु.र.नं 204/2025 कलम 303(2) बी.एन.एस

2) पोलीस ठाणे शिवाजीनगर गु.र.नं 454/2025 कलम 303 (2) बी.एन.एस

3) पोलीस ठाणे माजलगांव शहर गु.र.नं 376/2025 कलम 303 (2) बी.एन.एस

वरील तिन्ही गुन्हयातील निष्पत्र आरोपी हे पुढील तपासकामी पोलीस ठाणे बीड शहर यांचे ताब्यात देण्यात आला आहे.

सदरील कामगिरी श्री नवनित कॉंवत् पोलीस अधीक्षक, बीड, श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड. श्री शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शासह बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर,

महेश विप्रे पोलीस ह‌वालदार विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, महेश जीगदंड, राजु पठाण, युनुस शेख, गोविंद राख, पोलीस अंमतदार बबन सलगर, बप्पासाहेब घोडके, मनोज परजणे, आशपाक सय्यद,

अक्षय नाईकनवरे, विकी सुरवसे चालक पोलीस हवालदार गणेश मराठे, नितीन वहमारे, सुनिल राठोड सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!