महाराष्ट्र

ड्रॉ संपदा मुंडे यांच्या समर्थनार्थ परळी मध्ये जन अक्रोष मोर्चा चे आयोजन

Appeal to participate in the protest march to be held in Parli

Appeal to participate in the protest march to be held in Parli

डॉ संपदा मुंडे प्रकरणी बुधवारी परळीत जन आक्रोश मोर्चा

सुषमाताई अंधारे यांच्यासह संपदाच्या कुटुंबियांची उपस्थिती

परळी (वार्ताहर) वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे दिनांक 2 नोव्हेंबर 2025
बीड जिह्याची लेक डॉ. संपदा मुंडे यांचा झालेला संशयस्पद मृत्यू या प्रकरणी राज्यभर संतापाची लाट असताना या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा यासाठी परळीकरांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा बुधवार दि. 5 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

राणी लक्ष्मीबाई टॉवर पासून ह्या मोर्चाला सुरुवात होउन मोंढा मार्केट, एकमीनार चौक मार्गे रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी समारोप होईल.

डॉ. संपदाच्या न्यायिक लढ्यासाठी सातत्याने लढत असलेल्या सुषमाताई अंधारे व संपदाचे कुटुंबीय या मोर्चात सहभागी होणार आहेत.

सदरील मोर्चाद्वारे डॉ. संपदा मुंडे प्रकरण बीड येथे वर्ग करण्यात यावे, सर्व संशयितांची सखोल चौकशी करण्यात यावी, संपादा मुंडे यांनी वेळोवेळी केलेल्या तक्रारीची पोलीस व आरोग्य विभागाकडून वेळेत दखल न घेतलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या सखोल चौकशी करीता एक चौकशी समिती स्थापन करण्यात यावी यासह विविध मागण्या घेऊन परळीकर रस्त्यावर उतरणार आहेत.

या मोर्चामध्ये लहान थोरांसह हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान परळीकरांच्यावतीने करण्यात आले आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!