क्राईमखेळछत्रपती संभाजी नगरपुणेबीडमहाराष्ट्र

बीड मधुन धुम ठोकलेल्या त्या 3 मारेकऱ्यांचा धक्कादायक घटनाक्रम

Shocking sequence of events of those 3 fugitive accused who escaped from Beed

वेगवान मराठी बीड क्राईम रिपोर्टर प्रतिनिधी -दि 6 जानेवारी २०२५ -बीड जिल्ह्यातील  मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले ,सुधीर सांगळे हे घटने नंतर थेट गुजरातला गेले. गुजरात मध्ये 3 तारखे पर्यंत एका मंदिरात मुक्काम केला. परंतु पैसे संपल्याने दोघेही पुण्यात आले.

एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या. २६ दिवस पोलिसांना गुंगारा कसा दिला याची उकल पोलिस तपासात झाली आहे. दरम्यान, घटना घडल्यावर कसा केला प्रवास हे ही एसआयटीच्या चौकशीत समोर आले आहे. देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले, संतोष आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघेही आरोपी सोबतच होते. रेल्वेने ते गुजरातमध्ये गेले.तेथील एका शिवमंदिरात थांबले. जवळपास १५ दिवस तेथेच राहिले. मंदिरातच जेवण आणि झोपणे अशी त्यांची दिनचर्या आतापर्यंत होती.

धारूर तालुक्यातील वायबसे दाम्पत्याकडून आरोपींची महत्वाची माहिती पोलीसांनां मिळाली. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि नव्याने समावेश झालेल्या सिध्दार्थ सोनवणे या तिन्ही आरोपींना केज न्यायालयातून बाहेर काढताच नेकनूर पोलिस ठाण्यात आणले गेले तेंव्हा  एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांनी या तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली. यामध्ये नंतर सीआयडीच्या अधिकार्‍यांची इंट्री झाली चौकशीत  सहभाग नोंदवत अधिकाऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्याची उत्तरे देताना तिन्ही आरोपींना घाम फुटल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सुदर्शन घुलेजवळ असलेले पैसे दोन ते तीन दिवसांपूर्वी संपले. त्यामुळे यातील कृष्णा आंधळे हा पैसे नेण्यासाठी परत महाराष्ट्रात आला होता. एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता; परंतु त्याची वाट न बघताच घुले आणि सांगळे दोघेही पुण्याला आले, एका व्यक्तीला भेटणार होते; परंतु त्याआधीच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यामुळे कृष्णा आंधळे फरार होण्यात यशस्वी झाला आहे

सुदर्शन घुलेसह तिघे जण एका रेल्वेस्थानकावर होते. एका व्यक्तीचा मोबाइल घेतला. त्यात देशमुख हत्या प्रकरणाची बातमी यू ट्यूबवर पाहिली होती. तेथूनच त्यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. त्यामुळे ते महाराष्ट्रात थांबले नाहीत.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!