क्राईमबीड

लग्नाळु पोरांना टंच मुलींचे फोटो दाखवुण ब्लॅकमेल करणारी महिला जाळ्यात

Female hunters who prey on young men caught by police

 ति अविवाहित तरुणांना लग्नाचे अमिष व टंच तरुणींचे फोटो दाखवत लावायची  गळाला,

ति करायची ब्लॅकमेल आणि उकळायची धन दौलत ! क्राईम गाथा लग्नाळु पोरांची शिकार करणाऱ्या महिला शिकारणीची 

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी गजाआड……

वेगवान मराठी प्रतिनिधी -केशव डी मुंडे दिनांक 03 जून 2025 रोजी वडवणी पोलीस स्टेशन येथे मनीषा नरेंद्र ननावरे वय 25 वर्षे राहणार संगमनेर, ही तिची मैत्रीण वैभवी राम शेटे राहणार, संगमनेर,अहिल्यानगर हिला घेऊन आली व तिने पोलिसांना माझ्या मैत्रिणीला तिचे घरच्यांनी डांबून ठेवले होते व मी तिला सोडवले अशी हकीकत कथन केली, सुरुवातीला महिला अधिकारी या नात्याने वडवणी प्रभारी API वर्षा व्ह गाडे यांनी वैभवी व मनीषा हिची व्यवस्थित प्रेमाने चौकशी केली, तसेच सोडवणूक करणाऱ्या ड्रायव्हरला देखील बोलवून घेतले,

परंतु या तिघांनाही बोलवून घेतल्यानंतर तींघांची स्वतंत्र चौकशी केली असता मनीषाचे दोन दिवसापूर्वी नुकतेच गणेश बंडू घाडगे व 28 वर्षे राहणार उपळी, वडवणी या तरुणाशी लग्न झालेले असून त्यांनी सध्या लग्नासाठी मुली मिळत नाही आजारासाठी मनीष्याच्या मावशीला व तिच्या काकाला त्यांनी तीन लाख रुपये नगदी दिले असे कळाले,

तसेच मनीषा कडे वेगवेगळे आधार कार्ड असून तिचे काका व मावशी हे देखील नकली असल्याचे समजले,

लग्नासाठी मुली मिळत नसल्याने अनेक गरीब सर्वसाधारण,तसेच प्रतिष्ठित कुटुंबांना अशांचा शोध घ्यायचा,

लग्न होत नसल्या तरुणांना सुंदर मुलगी दाखवणे,नंतर तिच्या आईला कॅन्सर झाला आहे, किंवा तिला आई-वडीलच नाहीत किंवा इतर आर्थिक अडचण सांगून पैसे उकळणे, व पुन्हा पैसे घेवुन पळून जाणे किंवा पळून जायला जमले नसल्यास त्याच कुटुंबा विरुद्ध पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल करणे,

आणि अशावेळी त्या कुटुंबाने फसवणुकीच्या तक्रारीबाबत माघार घेणे, मी पुन्हा नवीन ग्राहक शोधणे,

अशी या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत आहे. रणजीत अहिरे या आरोपीच्या MH-17AE 2889 मारुती सुझुकी या गाडीचा मुलगी दाखवण्यासाठी तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वापर करत असे,

यामध्ये आतापर्यंत वडवणी पोलिसांनी 1)वैभवी शेटे( नवरी), 2) मनीषा ननावरे (नवरीची मैत्रीन)
3) रणजीत अहिरे( ड्रायव्हर) तिघेही राहणार संगमनेर अहिल्यानगर व 4)यमुनाबाई शिंदे,( मध्यस्थी) यांना अटक केली असून यात एकाच नावाचे विविध आधार कार्ड, व एक चार चाकी असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त आहे.

तरी अशा प्रकारचे प्रकरणे आल्यास त्याला बळी लग्न जुळवण्यासाठी कोणत्याही प्रकारे पैसे देऊ नये असे आव्हान बीड पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

ही कारवाई अधीक्षक नवनीत कावत व अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली

वडवणीच्या प्रभारी अधिकारी Api वर्षा व्हगाडे, psi संजय राठोड, psi राजू राठोड, पुरुष अंमलदार विलास खरात, अविनाश गवळी व महिला पोलीस सुवर्णा खोसे यांनी केली.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!