बीड करांच्या स्वप्नातील रेल्वे धावणार !! पण मुंडे साहेबांची कमी भासणार !
Train will run in Beed on September 17, Marathwada Liberation Day

!! Beed train will run on 17th September, Marathwada Liberation War Day !!
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड मध्ये धावणार रेल्वे
केशव डी मुंडे वेगवान मराठी -दि.3 स्पटेंबर 2025 बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर दाखल होणार असून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे बीडकरांचे अनेक दशकांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्णत्वास जाणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस महापारेषण कंपनीचे महाव्यवस्थापक संजीव कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव दशपुते, वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए, रेल्वे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांनी बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गावरील प्रलंबित भूसंपादनाची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले.
राज्य सरकारच्या हिस्स्यातील १५० कोटी रुपये तत्काळ अदा करावेत तसेच उर्वरित १५० कोटींची तरतूद करावी, असेही त्यांनी सांगितले.
रेल्वेने दिलेल्या निधीच्या उपयोगिता प्रमाणपत्राची कार्यवाही करण्यावरही त्यांनी भर दिला.
🔹 आसा आहे- परळी -बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्ग 🔹
एकूण लांबी : २६१.२५ किमी भूसंपादन : १८२२.१६८ हेक्टर
रेल्वे खालील पूल : १३०
रेल्वे वरील पूल : ६५ मोठे पूल : ६५ छोटे पूल : ३०२
प्रकल्प किंमत : ४८०५.१७ कोटी
हिस्सा : केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी ५०% (२४०२.५९ कोटी)
या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळाल्यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांना थेट रेल्वेसेवेचा लाभ मिळणार असून या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.
येत्या १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे.
यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासीयांचे रेल्वे सेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. २६१.२५ किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे.
बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणे बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने निकाली काढून आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी.
या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम तातडीने अदा करण्यात यावी. अर्थसंकल्पात मंजूर १५० कोटी रुपये देण्यात यावे. उर्वरित १५० कोटी रुपयांची तरतूद करावी. – उपमुख्यमंत्री पवार यांचे जिल्ह्या प्रशासणास आदेश
या बैठकी संदर्भातील माहिती शासणा च्या प्रसारण विभागासह स्वतः आजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत सोशल साइटवरुण प्रसारीत केली आहे 👇
आज मध्य रेल्वेच्या अहिल्यानगर-बीड-परळी या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामाबाबत आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत प्रलंबित कामं, रेल्वेसंदर्भात नवीन धोरण, जमीन खरेदीसंबंधी येणाऱ्या अडचणी, स्थानकांसाठी आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरे तसंच इतर प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रकल्पासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं आश्वासन यावेळी दिलं. त्याचप्रमाणे प्रलंबित कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.
या प्रकल्पामुळे रेल्वे सेवा सुधारून नागरिकांच्या प्रवासाच्या सोयीत भर पडेल आणि या भागाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, अशी खात्री आहे.
📍सह्याद्री गेस्ट हाऊस, मुंबई

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.







