बीडराजकारण

बीड जिल्हा बाहेरच्या लोकांनी नाही तर तुम्ही पोसलेल्या गुंडांनी बदनाम केला

यालाच म्हणता चोराच्या उलट्या बोंबा -लुगडे महाराज

बीड जिल्हा बाहेरच्या लोकामुळे नाही तर तुम्ही पोसलेल्या गुंडांनी बदनाम केला

यालाच म्हणतात “चोराच्या उलट्या बोंबा” –देवराम लुगडे (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)

–  वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे-परळी दिनांक 20 जुलै 2025 बीड येथे कार्यक्रमा दरम्यान माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक वक्तव्य केलं की बाहेरच्या लोकांनी बीड जिल्हा बदनाम केला. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा बाहेरच्या लोकांनी नाहीतर माझी मंत्र्यांनी पोसलेल्या गुंडांनीच बीड जिल्हा बदनाम केला असल्याचा घनाघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केला आहे.

बीड जिल्ह्याची माती खूप पवित्र असून या मातीमध्ये राहणारे सर्व जाती धर्मातील सर्वसामान्य 98 टक्के लोक हे संतांच्या महामानवांच्या विचाराचे पाईक आहेत.

या बीड जिल्ह्याच्या पवित्र भूमीत सर्वधर्मसमभावाचा ध्यास मनामध्ये घेऊन एकमेकांना सन्मान एकमेकांचे सुखदुःख वाटून घेणारे एकमेकांच्या अडीअडचणीला धावून एकमेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे लोक या बीड जिल्ह्यामध्ये राहतात.

या बीड जिल्ह्यामध्ये केवळ माजी मंत्री यांच्या कुविचारी प्रवर्तीच्या तुमचे लाभार्थी आसणाऱ्या 2 % टक्के लोकांनी या बीड जिल्ह्याला खऱ्या अर्थाने बदनाम केलं.

शांततामय प्रेमळ बीड जिल्ह्याची खरी ओळख पुसून या बीड जिल्ह्यामध्ये नंगानाच घातला अन्याय अत्याचार भ्रष्टाचार गुंडागर्दी सोशन करणाऱ्या लोकांना कोणी पोसलो हे अख्या जिल्ह्यातील जनता जाणत आहे.

लोकांना बोलण्यापेक्षा किंवा बाहेरच्या लोकांवर टीका करण्यापेक्षा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आत्मचिंतन करावं

अजूनही वेळ गेलेली नाही एवढं भयानक पद्धतीत संकट किंवा एवढ्या भयानक पद्धतीत अख्ख्या भारत देशात प्रकरण बीड जिल्ह्यातले गाजत असताना त्यावर चिंतन करणे सोडून नाक गेलं तरी भोक हाय या म्हणी प्रमाणे यांचा कारभार चालू असून आता तरी सुधारणा होणं गरजेचं आहे

म्हणून दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा माजी मंत्र्यांनी स्वतःसह आपल्या पिलावळीला सुधारण्याचं काम करावं ही माफक अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी व्यक्त केली आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!