
केशव मुंडे वेगवान मराठी परळी दि 11आक्टोंबर 2024
आंबा आरोग्यभवानी डोंगर तुकाई हेच ठिकाण श्री गुरुचरित्र या ग्रंथात 14 व्या अध्यायात या ठिकाणाचे वर्णन व महत्त्व सांगितले आहे ज्यावेळी नृसिंहसरस्वती स्वामी महाराज एक वर्षभर पर्यंत अज्ञात होते त्यावेळी श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री सायं देवाला या ठिकाणीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्याया पर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे चरित्र म्हणजेच पूर्व गुरुचरित्र सांगितले व चौदाव्या अध्याया च्या नंतरचे सर्व लिखाण श्री सायन देवाने स्वतःच्या म्हणजे कडगंजी या गावी पूर्व स्मरण करून गुरुकृपेने पूर्ण केले पण या ठिकाणाबद्दल संप्रदायातील फार कमी लोकांना माहिती आहे या ठिकाणाचा प्रचार प्रसार होणे फार अत्यंत आवश्यक आहे असे वाटते या ठिकाणी डोंगर तुकाई या नावाची एक देवीचे मंदिर असून मंदिरातील गाभाऱ्या तू नच आत म्हणजे स्वामी महाराजांच्या अज्ञातवासातील स्थळी गुहेत जाण्यासाठीचा अत्यंत अवघड असा मार्ग पाहायला मिळतो सदरील ठिकाणी भेट दिल्याने मनाला अत्यंत प्रसन्न वाटते आत्मिक समाधान लाभते आंबा मातेच्या भाविकांनी मातेच्या दर्शना बरोबरच या ठिकाणी असणाऱ्या स्वानंद दत्तपादुकांचे दर्शन अवश्य घ्यावे हे ठिकाण श्रीक्षेत्र परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणाहून अगदी दोन किलोमीटर अंतरावर परळी घाटनांदुर मार्गा लगत चांदापुर या गावाच्या जवळ आहे…
नवरात्री मध्ये या ठिकाणी परळी वैजनाथ परिसरातील तुकाई मातेचे भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाचा लाभ घेतात , वैजनाथ मंदिराच्या पुर्व दिशेला हालगे पेट्रोल पंपापासुण थोड्याच अंतरावर डोंगर तुकाई मातेच्या दर्शनासाठी मोफत वाहणांची व्यवस्था केलेली आहे ज्यांना स्वतंत्र वाहण उपलब्ध नसेल किंवा बाहेरील यात्रेकरु या मोफत वाहन सेवेचा लाभ घेऊ शकतात याच बरोबर मंदीराच्या ठिकाणी सकाळी खिचडी प्रसादाचे वाटप देखील करण्यात येते, सध्या या ठिकाणीं नवरात्रीच्या निमित्ताने भाविकांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसुण येत आहेत …

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.






