राज्यातील आचारसंहिता शीथिल करा- राज्य शासनाची मागणी

वेगवान मराठी / अरुण थोरे
मुंबई, ता. 23 में – राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने, राज्य भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असून राज्य शासनाने राज्यातील आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
आता बारमालकांना भरावा लागेल ५० हजार दंड
सध्या मे महिना सुरू असून तीव्र झळा बसत आहे ठीक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई चे संकट उडवले असून राज्यातील मोठमोठे शहर शहरांना पाण्याचा तसेच ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. म्हणून राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे.
ठाकरे पवारांना सहानुभूती, पंकजा मुंडे सुनेत्रा पवार आणि मी निवडून येणार…
आचारसंहिता असल्याने पाणी संकटावर ठोस निर्णय घेण्यासाठी निवडणूक आचारसंहिता शिथिल करावी,याबाबत निवडणूक आयोगाकडून कोणतेही प्रत्युत्तर मिळाले नसले तरी विरोधी पक्षाने मात्र राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी राजकारण ते पोलीसा पर्यंत सारवासारव
विरोधी पक्षनेते नाना पटोले यांनी सांगितले की राज्य दुष्काळाचा मोठा सामना करत असुन आम्ही चार महिन्यापूर्वीच उपाययोजना आखाव्या अशा सरकारला सूचना केल्या होत्या मात्र सरकार अंतर्गत कुरघोडी व पक्ष फोडण्यात व्यस्त होते.
Monsoon Update मान्सूची हजेरी… मान्सून येत आहे! पण कोणत्या मार्गाने, घ्या जाणून
पाणीटंचाईच्या अनुषंगाने मुख्यमंत्री संभाजीनगर येथे आढावा बैठक घेणार असून पुढील दोन दिवसात पाणीटंचाई बाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
