आता बारमालकांना भरावा लागेल ५० हजार दंड
आता बारमालकांना भरावा लागेल ५० हजार दंड भरावा लागणार आहे. कारण दारुमुळे मोठं नुकसान होत असल्याची माहिती समोर येत आहे.

वेगवान मराठी / अरुण थोरे
मुंबई,ता. 23 –
आता अल्पवयीन मुलांना मध्य विक्री केल्यास बार मालकांना होणार ५० हजारांचा दंड होणार असुन,पुण्यात घडलेल्या हिट अँड रन च्या घटनेमुळे उत्पादन शुल्क विभागाने अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केल्यास बारमालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ( Now bar owners have to pay 50 thousand fine )
ठाकरे पवारांना सहानुभूती, पंकजा मुंडे सुनेत्रा पवार आणि मी निवडून येणार…
पुण्यातील हिट अँड रन केस देशभरात चर्चेत आली आहे. सदर प्रकरणाला राजकीय वळन मिळाल्याने, सर्व स्तरातून पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्थेवर टीकेची झोड उठल्याने राज्याच्या गृह विभागाला टीकेचे धनी व्हावे लागले होते.या सर्व प्रकरणाची चर्चा देशभरात सुरू असल्याने, उत्पादन शुल्क विभागाने आता अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केल्यास बारमालकांवर कारवाई केली जाणार असुन, बारमालकांना 50 हजार रुपयांचा दंड होणार आहे.
बॅंकेतील एफडी खोट्या! बॅंकेतील एफडी निघाल्या बोगस ! तुम्ही पण एफडी केलीयं का ?? video
पुण्यात घडलेल्या या हिट अँड रन प्रकरणामुळे चांगलेच राजकीय वातावरण तापले असुन, ऐन निवडणुकीत सरकारची ही गोची झाल्याचं चित्र आहे. यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर पावले उचलल्याचे सांगितले जात आहे सदर प्रकरणी पबचालक व बारमालकावरही गुन्हा दाखल केला असून, राज्य उत्पादन शुल्क विभाग ऍक्टिव्ह मोडमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी राजकारण ते पोलीसा पर्यंत सारवासारव
