PM-Kisan शेतक-यांना मिळणारी पीएम किसान पेन्शन बंद होणार ?
PM-Kisan शेतक-यांना मिळणारी पीएम किसान पेन्शन बंद होणार ?

वेगवान मराठी / अरुण थोरे
नवी दिल्ली , ता. 23 में 2024
ही योजना सुरु झाली आणि लोक काही महिन्यानंतर आपले खाते तपासून पाहु लागले, की पेन्शन आली की नाही.. मात्र या निवडणूकीमध्ये आम्हाला पेन्शन नको, शेतीला भाव द्या असे अनेक शेतक-यांना म्हणतांना आपण पाहिले असेल. आणि यातील अनेक शेतक-यांना मोदी सरकारीच पीएम किसान योजना चांगली असल्याचे म्हटलं आहे.
आता बारमालकांना भरावा लागेल ५० हजार दंड
मात्र जर देशात मोदी सरकार पडलं तर पीएम किसान योजना बंद करण्यात येणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.
ठाकरे पवारांना सहानुभूती, पंकजा मुंडे सुनेत्रा पवार आणि मी निवडून येणार…
वर्षाला सहा हजार देणारी पीएम किसान योजनेचा सत्ताधारी पक्षाकडून नेहमीच उदो उदो केला जातो.२०१९ ला निवडणूक तोंडावर ठेवून केंद्रातील मोदी सरकारने या योजनेची सुरुवात केली होती.
बॅंकेतील एफडी खोट्या! बॅंकेतील एफडी निघाल्या बोगस ! तुम्ही पण एफडी केलीयं का ?? video
आता या योजनेला पाच वर्षे पूर्ण होत असुन,याच पार्श्वभूमीवर निती आयोग सर्वेक्षण करत असून,सदर योजनेचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला याचा अभ्यास करून, सदर योजनेत बदल केल्या जाण्याची शक्यता जास्त आहे.
ईव्हीएम मशीन जवळ रात्री कोण काय करत होते ? ईव्हीएम सुरक्षा बाबत प्रश्नचिन्ह
देशात शेतमालाच्या भावा वरून मोदी सरकारवर प्रचंड नाराजी आहे. पुढील काळात येणाऱ्या लोकसभेच्या निकालानंतर देशात मोदी सरकार आल्यास पीएम किसान योजनेत बदल करून ही नाराजी कमी करण्याचा प्रयत्न सरकार करु शकते.
वेगवान मराठीमध्ये नोकरीची नामी संधी
सरकार कुणाचं येते यावरच पुढील बदल अवलंबून असतील. या योजनेत नविन ९० हजार लाभार्थ्यांच्या सामावेश केल्याची माहिती मिळत असुन, शेती प्रश्नाला बगल देण्यासाठी सरकारने या योजनेची अनेकदा ढाल म्हणून उपयोग केल्याचं पाहण्यास मिळाले.
मान्सूची हजेरी… मान्सून येत आहे! पण कोणत्या मार्गाने, घ्या जाणून
येत्या काळात कोणाचे सरकार येतं याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण येणार सरकार पेन्शन वाढविते की बंद करते हा सरकारचा निर्णय आहे. पंरुत सध्या चर्चा मात्र जोरात आहे. पेन्शन बंद होणार असं अधिकृत कोणी जाहिर केलं नाही…हेच आजाचे तरी सत्य आहे.
