पुणे कल्याणीनगर घडलेल्या प्रकरणात वेगळेच राजकारण !

वेगवान मराठी / रमेश जयस्वाल
पुणे, ता. 24 में –
पुणे कल्याणीनगर परिसरात भरधाव कारच्या धडकेने युवक आणि युवतीचा एका अल्पवयीन मुलाने मोटरसायकलला धडक देऊन जीव घेतला• जीव जाणारे जीवाने गेले याचे आज पुण्यात राजकारण रंगत आहे जशी काय रंग पंचमी सुरू आहे मी लाल टाकतो तू हिरवा टाक मग दुसरा येतो भगवा,निळा,गुलाबी,काळा,नारंगी एक मेकवर टाकण्यात गूंग आहे • करोडपती बिल्डर आणि त्याच्या अल्पवयीन मुलास वाचविण्यातच जोतो धाव घेत आहे• अपघातात आयटी विभागात काम करणारे तरूण तरूणी जीवाने गेले यांच्या कुटूंबियांना पक्ष बाजूला ठेऊन सहारा देणे येथिल राजकारण्यांचे कर्तव्य असतांनाही गेलेल्या दोन जिवाच्या कुटूंबियांना सरकार कडून कोणत्या प्रकारे सहकार्य मिळू शकते याचे भान येथिल राजकारण्याना राहले नाही•
cyclone Update मोठं चक्रीवादळ धडकणार ! मान्सूनवर परिणाम ?
राजकारण ईतर ठिकाणी केल्या जाऊ शकते पण मृत्यू पावलेल्या वरही राजकरण सुरू आहे ही एक पुणे सारख्या संस्कृतीक नगरीला अशोबनिय बाब आहे• कारच्या धडकेने मारणारा अल्पवयीन मुलगा त्यात त्याचे पालक धनाड्य आणि त्याचे आजोबांचे संबंध अंडरर्ल्ड बरोबर आणि याला वाचविण्या करिता येथिल राजकारणी एकमेकावर चिखल फेकत आहे ही एक शरमेची बाब असल्याची चर्चा पुर्ण पुण्यात पसरली आहे• आपली तूमडी भरण्याकरता आणि राजकिय पोळी भाजण्यासाठी कोण कोणत्या थरावर जातो हे पुण्यात घडलेल्या घटणेचे पुर्ण भारतातील जनता शरमेने मान खाली घालत असल्याचे चित्र दिसत आहे• हे राजकारणी या घटणेचे चार दिवस गाजावाजा करतील परंतू जे युवक, युवती या घटणेत मरण पावले यांना वाली कोण साधी चर्चा , नाव सुध्दा यांचे घेण्यात आले नाही याची काही मर्यादा आहेच•
अखेर जामीन रद्द मुक्काम बालसुधार गृहातः पण हा नंगानाच कोण थांबविणार?
पब कल्चर ते महाविद्यालय कनेक्शन
पुण्यात पब कल्चर ते महाविद्याल यातिल तरूण -तरूणी यांचे आकर्षण केंन्द्र म्हणून उदयास येत आहे • पब मध्ये गर्दी वाढावी म्हणून पबचालका कडून पीआर म्हणजे शहरातील काही शिक्षणसंस्था मध्ये या पब चालकांचे जनसंपर्क अधिकारी तरूण -तरूणींना आणण्यासाठी यांची नियूक्ती केली जाते जोतो पब चालक मालक अल्पवयीन युवकांची गर्दी होण्यासाठी पब चालक पीआरची नेमणूक करतात • महाविद्यालयातील युवक-युवती यांचा कपल प्रवेश म्हणून 200 रूपये पब करिता घेतात या बदल्यात पीआर लाखो रूपये कमवितो येणारे कपल मद्य येथे विकत घेतात• या पब मध्ये विकत मिळणारे मद्य म्हणजे दुसरी कडे वॉईनशॉप पेक्षा तीन ते चार पटीने महाग असतात म्हणून हे पब चालक माजतात • पुण्यातील उपनगरातील तसेच ईतर ठिकाणचे जास्त पब चालक हे राजकिय नेते,नगरसेवक, प्रशासकिय अधिकारी यांच्या सोबत असलेले संबंधित आहे•उपनगरातील कानाकोपरात असलेले अनेक पब हे बिना दिक्कत सुरू आहे अनेक शाळा महाविद्यालयाशी यांचा संपर्क असल्याचे निर्दशनात येत आहे याची साधी कल्पना पोलीस विभागाला नाही ही एक शोकांतिका आहे•
आजोबांचेच अंडरवर्ल्ड बरोबर लागे बांधे
अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील राजनशी संबंध• शहर पोलिसांसह केंद्रीय अन्वेषम विभाग यांनी याचे प्रकरण उघडकिस आणले आहे संपत्तीच्या वादातून सख्या भावाच्या मित्रावर अजय भोसले यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे ही घटना 2009 मध्ये कोरेगाव पार्क परिसरात घडली होती याची सुनावणी मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुरू आहे याची पुढील सुनावणी चार जूनला होणार आहे• असले अंडरवर्ल्ड यांचे राजकारण्या सोबत नातेगोते असल्यास मग हे कोणत्या तोंडाने जनतेला मते मागतात आज बेसरमाचा कळस उदयास येत आहे यात सर्व सामान्य जनतेने कोणाला न्याय मागावा •अपघात अल्पवयीन धनीक पूत्रा कडून घडतो यात याचे पालक आपली आणि मुलाची चामडी वाचविण्या करिता आकावतांडव करता या पुढे पोलीसांना हाताशी धरून हा सुटणारच •विशाल अग्रवाल पूरावे नष्ट तर करणारच आणि आपली चांमडी वाचविण्या करिता अपघातात मरण पावलेल्या कुटूंबियांना आपल्या पैशाच्या जोरावर विकत घेऊन त्यांचे तोंडे बंद करण्यासाठी राजकारणी निती अबंलणार हे काळ आणि वेळच सांगेल•’
