सोयगावातील वाडी व पळाशी येथे शिवसेना(शिंदे गट) तालुका प्रमुख केतन काजे यांच्या उपस्थितीत महिला लाडकी बहीण योजना फॉर्मचे वाटप व नोंदणी

विजय चौधरी/वेगवान मराठी
सोयगाव: ता.१०/महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना विषयी तालुक्यातील वाडी व पळाशी येथील महिलांना शिवसेना(शिंदे गटाचे) तालुका प्रमुख केतन काजे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करून महिलांना फॉर्मचे वाटप करून ते भरून घेण्यात आले यावेळी केतन काजे यांनी सांगितले की “लाडकी बहीण” योजनेचा गरजू महिलांना लाभ मिळावा यासाठी शिंदे सरकार प्रयत्नशीर आहे यावेळी तालुका प्रमुख केतन काजे यांच्या उपस्थितीत या योजने विषयी महिलांना मार्गदर्शन करून त्यांना जागेवर फॉर्म देऊन ते भरून घेण्यात आले यावेळी शिवेसना तालुका संघटक नितीन बोरसे, विभाग प्रमुख निलेश निकम उपविभाग प्रमुख अमोल सूर्यवंशी,वाडी येथील सरपंचा वैशाली नितीन बोरसे, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल बोरसे,भूषण पाटील,प्रभू तायडे,आबा तायडे,अक्षय अवचार धीरज सोळंके यांच्यासह शेकडो महिलांची उपस्थिती होती
