मनोरंजन

अमिताभ बच्चन आणि रेखामध्ये अफेर होतं का ? बच्चन काय म्हटले

अमिताभ बच्चन आणि रेखामध्ये काय होतं- स्वता अमिताभ स्पष्ट बोलले What happened between Amitabh Bachchan and Rekha - Amitabh himself spoke clearly

वेगवान मराठी / दिंपक पांडे

मुंबई, ता 11 सप्टेंबर 2024- . Bollywood  माणूस हा सगळ्यात संवेदनशील असल्यामुळे प्रत्येक जण वेगवेगळ्या विचार करत असतो, हा विचार फिल्म इंडस्ट्रीज साठी अगदी वेगळ्या दृष्टीने बघतल्या जातो. प्रेम ही संकल्पना अनेक युगे ना युगे चालत आलेली आहे. तिला कोणी फाटा देऊ शकत नाही. स्त्री-पुरुष एकमेकांच्या जास्त जवळ आले की प्रेमचा उगम होतो. हे आपण चित्रपटामध्ये अनेक वेळा अथवा जीवनात पाहत आलो आहे.  Affair between Amitabh Bachchan and Rekhawas it What Bachchan said

चित्रपट सृष्टीचे बीग बी म्हणजे अमिताभ बच्चन हे असं नाव आहे की ज्यांच्याकडे संपूर्ण देश पहातो. अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहे. अजून पर्यंत अमिताभ बच्चन एवढे वयस्कर झाले असले तरी अजूनही त्यांचा चित्रपट सृष्टीवर दबदबा कायम आहे. मात्र या महानायकाचे रेखा सोबत कोणते सबंधं होते हा प्रश्न चित्रपट चहात्यांना पडल्याशिवाय राहत नाही.

रेखा आणि अमिताभ यांचे अनेक वेळा नाव जोडल्या गेले , अश्या अनेक बातम्या पण त्या काळामध्ये येत राहिल्या बच्चन यांनी फिल्मी दुनियामध्ये अशी ओळख निर्माण केली की त्याना कोणी ओळखत नाही असा कोणी व्यक्ती नाही.

एक प्रसंग असा येतो की  जया बच्चन बाजूला बसलेल्या असतानाच अमिताभ यांना रेखाबरोबरच्या कथित अफेअरबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन चर्चेला तोंड फुटलं आणि यावरुन लोकांनी टिकाही केली.

अमिताभ बच्चन जया बच्चन आणि रेखा हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक दिग्गज अभिनेत्या मधून आहेत .70 आणि 80 च्या दशकामध्ये या तीन सितारांनी चित्रपर सृष्टी वरती आपलं अधिराज्य गाजवलं आता या तिघांची  जोडी मात्र तुटलेली आहे. अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे कनेक्शन यावर अनेक अफावा उठत राहिला. त्याचे कारण 1981 नंतर अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी कोणत्या चित्रपटात पुन्हा काम केला नाही.  2008 मध्ये जया बच्चन यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी एकत्र काम केलं तुम्हाला काही अडचण आहे का, त्यावर जया बच्चन यांनी सांगितले मला काही अडचण नाही. मात्र यामुळे अफवा जास्त पसरतील.

अमिताभ बच्चन अभिनेत्री रेखाबद्दल खोटं बोलले की काय? अशी चर्चा सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये सुरु आहे. या चर्चेला कारण ठरत आहे, ‘रेंडेवू विद सिमी ग्रेवाल’ चा एक जुना भाग! या भागाबद्दल सिमी ग्रेवाल यांनीच भाष्य केलं असून त्या ज्या भागाबद्दल बोलत आहेत त्यामध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांची मुलाखत घेतली होती. अमिताभ बच्चन त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करत असतानाच हा भाग प्रदर्शित झालेला.

थेट रेखाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा मुलाखतीदरम्यान अमिताभ बच्चन यांना त्यांच्या कथित प्रेमप्रकरणाबद्दल आणि रेखासोबत नाव जोडलं जातं यावरुन विचारण्यात आलं. त्यावेळेस त्यांनी रेखाबरोबर अफेअर असल्याचं नाकारलं होतं. हे दावे फेटाळताना अमिताभ यांनी, “ती माझी सहकलाकार आणि कलिग आहे. जेव्हा आम्ही एकत्र काम करत होतो त्यावेळी सहाजिक आहे की आम्ही एकमेकांना भेटायचो. सामजिक स्तरावर आम्हा दोघांमध्ये काहीही नातं नाही. मी एवढच सांगू शकतो. कधीतरी आम्ही एखाद्या सोहळ्यामध्ये एकमेकांसमोर येतो. किंवा कधीतरी एखाद्या कार्यक्रमाला एकत्र हजर असतो तेव्हाही एकमेकांसमोरुन क्वचितच जातो. बसं इतकच,” असं अमिताभ यांनी सांगितलं होतं.

अनेकजण म्हणाले अमिताभ खोटं बोलले

या मुलाखतीमध्ये सिमी ग्रेवाल यांना अमिताभ यांनी फार प्रमाणिक स्पष्ट उत्तरं दिली असं अनेकांना वाटत होतं. मात्र स्वत: सिमी ग्रेवाल यांना याच्या अगदी उलट वाटत होतं. “मला वाटतं की त्यांनी प्रमाणिकपणे उत्तर दिली. या मुलाखतीनंतर काही लोकांनी, “अमिताभ बच्चन असा नाहीये” असंही म्हटलं. तसेच काहींनी, “त्यांनी रेखाबद्दल खरं सांगितलं नाही,” असंही म्हटलं,” अशी माहिती सिमी ग्रेवालने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!