भगवानबाबा भक्तांना पावले पंकजा ताईच्या दसरा मेळाव्याला धनुभाऊ धावले
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे भगवान भक्ती गडावर प्रथमच एकत्र

केशव मुंडे वेगवान मराठी प्रतिनिधी परळी बीड दि.10.10 2024
बीड सुप्पे सावरगांव: –चलो भगवान भक्तीगड.! आपला दसरा, आपली परंपरा.! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय,तुम्ही पण या…!
आज धनंजय मुंडे यांनी वरील पोस्ट त्यांच्या सोशल अकाउंट वरुण केली आहे भगवान भक्ती गडावर मि प्रथमच येणार आसल्याचे सांगीतले आहे तर तुम्ही पण दसरा मेळाव्याला या आसे समर्थकांना आव्हाण करुण हि पोस्ट त्यांनी पंकजा गोपीनाथ मुंडे यांना मेन्सन करत हैशटैग भगवान भक्ती गड दसरा मेळावा सावरगाव आसा उल्लेख केला आहे त्यामुळे भगवानबाबांच्या भक्तांमध्ये आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या मुंडे समर्थकां मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आसुण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांची मागील दहा वर्षापासुणची आसलेली इच्छा यावर्षीच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुर्ण होत आहे …
मागील पंधरा वर्षापुर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबात उभी फुट पडल्या नंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता त्यानंतर शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी करुण गोपीनाथ मुंडे यांना राजकिय शह देण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये अपयशी ठरलेल्या पवार कुटुंबियांनी मुंडे साहेबांच्या निधना नंतर भारतीय जनता पक्षा कडुण पंकजा मुंडे यांची होणारी परताडणा ओळखुण डाव साधला आणि पंकजा मुंडे सांभळत आसलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या आणि पर्यायाने भाजपच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यात पवारांना धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून यश आले.यामध्ये त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नविन भाजपाची देखील समर्थ साथ मिळाली आणि भगवानबाबां पासुण ते गोपीनाथ मुंडे यांच्या कारकिर्दीच्या काळा पर्यंत एकसंघ आसलेल्या समाजीची मोट विस्कळित झाली परंतु पंकजा मुंडे यांनी आपल्या परीने गोपीनाथ मुंडे यांच्या वारसाला शोभेल आसा लढा देत भगवानबाबा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथा व परंपरांचा वारसा जपण्याचा प्रामाणिक पणाने प्रयत्न सुरू ठेवला तो आजतागायत टिकुण आहे !
“जे पेरले तेच उगवले”
भारतीय जनता पार्टी आणि शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या शक्ती स्थळांवर हाल्ले चढवत पंकजा मुंडे यांची राजकिय ताकद कमी करण्यासाठी जे षडयंत्र रचले जे हातकंडे वापरले गेले ज्या व्यकतींचा या षढयंत्रांमध्ये आयुधं म्हणुण वापर केला गेला एवढच नाही तर पंकजा मुंडे यांच्यासाठी जे खड्डे खोदुण ठेवले गेले ते सर्वच्या सर्व कारनामे आज घडीला देवेंद्र फडणवीस शरद पवार आणि भारतीय जनता पक्षासह या कटकारस्थानामध्ये सहभागी आसलेल्यांना भोगावे लागत आहेत ! मग तो विषय भगवानगडा वरील दसरा मेळाव्याचा आसो कि नामदेव शास्त्री सानप यांना समोर करुण पंकजा मुंडे यांना कमी लेखण्याचा आसो नाही तर मंत्रीमंडळात आसताना पंकजा मुंडे यांच्यावर खोटे आरोप करण्यासाठी दिलेल्या सुपारीचा आसो किंवा मंत्रीमंडळातील एक एक करुण खाते काढुण घेण्याचा आसो नाही तर रमेश कराड,भागवत कराड यांच्या सारख्या दुय्यम स्थानी आसलेल्या जवळच्याच लोकांना ताकद देऊण पंकजा मुंडे यांचे पक्षातील महत्व कमी करण्यासाठी केलेला केविलवाणी प्रयत्न आसो मात्र याचं फलीत शुन्य झाल्या मुळे आज घडीला भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात बैकफुटवर आला आसुण शरद पवारांना देखील आजित पवारांनी केलेल्या बंडामुळे त्यांच्या कर्माची प्रचिती चांगलीच आली आहे …
या सगळ्या घटणाक्रमातुण एक गोष्ट चांगली घडली ति म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबियांचे झालेले मनोमिलन ! ज्यामुळे खुप काही गमवावं लागलं जो संघर्ष करावा लागला त्या चुका सुधारुण एकत्रीत वाटचाल चालु ठेवली तर समाजा बरोबरच वारसदारांच्या पण फायद्याचे ठरणार आहे आणि भगवानबाबांची पण तशीच इच्छा आसेल म्हणुण तर ज्यांच्या खांद्यांवर बंदुक ठेऊण दसरा मेळाव्याला विरोध करण्यात आला आज तेच धनंजय मुंडे याच दसरा मेळाव्याला यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी घाम गाळत आहेत हा भगवानबाबांच्या भक्तीचा विजय आहे हा जिव्हाळा आणि प्रेम आसेच वृध्दींगत व्हावे हिच भगवानबाबांच्या चरणी प्रार्थना
📝केशव मुंडे वेगवान मराठी –8888 387 622
Pankaja Gopinath Munde dhananjaymunde #DasaraMelava#BhagwanBhaktigad

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.