
वेगवान मराठी महाराष्ट्र परळी बीड प्रतिनिधी दि -23 आष्टी मतदार संघातील चौरंगी लढती मध्ये झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपच्या सुरेश धस यांनी एकतर्फी विजय खेचुन आणला आसुण 80 हजार मताच्या फरकाने अपक्ष उमेदवार भिमराव धोंडे यांचा पराभव केला आहे ,
गेवराई मतदारसंघात राष्ट्वादी कांग्रेस आजित पवार गटाचे विजयसिंह पंडित यांनी अनपेक्षितपणे मुसंडी मारत शिवसेना युबीटी चे उमेदवार बदामराव पंडित यांचा 42 हजाराच्या आसपास मतांनी पराभव करून विजय संपादन केला आहे…
परळी मतदार संघ: –सर्व राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या बहुचर्चित परळी मतदार संघात राष्ट्वादी कांग्रेस आजित पवार गटाचे फायरब्रैंड नेते धनंजय मुंडे यांनी “न भुतो न भविष्यती आसा ऐतिहासीक आणि एकतर्फी विजय खेचुन 1 लाख 40 हजाराच्या फरकाणे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा लाजिरवाना पराभव करून मुंडे बहिण भाऊ यांनी बीड लोकसभेतील पंकजा मुंडे यांच्या पराभवाचा वचप्पा व्याजासह काढला आहे,साताऱ्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नंतर मोठ्या मताधिक्यांनी निवडुण येणारे धनंजय मुंडे हे दुसऱ्या क्रमांकाचे आमदार ठरले आहेत

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








