बीडराजकारण

बीड,केज,आणि माजलगांव मतदारसंघात कोणी मारली बाजी

संदिप क्षिरसागर,प्रकाश सोळंके,आणि नमिता मुंदडा यांनी गड राखले

वेगवान मराठी परळी बीड महाराष्ट्र प्रतिनिधी दि.23 नोव्हेंबर 2024 -बीड जिल्ह्यातील अटीतटीच्या लढतीमध्ये बीड माजलगांव आणि केज मतदारसंघातील उत्सुकता शिगेला पोहचली होती या अटीतटीच्या लढतीमध्ये केज मतदार संघातुन राष्ट्वादी कांग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांचा शेवटच्या फेरीत भाजपच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी 3800 मतांनी पराभव करून भाजपसह स्वतःचा गड राखत विजय संपादन केला आहे

माजलगांव मतदारसंघात देखील सुरवातीपासूनच राष्ट्वादी कांग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मोहन जगताप यांना प्रत्येक फेरीत अल्पशा प्रमाणात का होईना पण आघाडी मिळत आसल्याने मतदार संघातील कार्यकर्त्यांचा श्वास रोखला गेला होता परंतु शेवटच्या षटकात धोनीने सामना जिंकावा तशाच प्रकारे महायुती,राष्ट्वादी कांग्रेस आजित पवार गटाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी वाघाच्या तोंडातला घास काढल्यागत 5 हजारापेक्षा जास्त मतांनी विजय खेचुन आणला आहे

बीड मतदार संघ शरद पवार आणि खा.बजरंग सोनवणे यांनी संदिप क्षिरसागर यांच्यासाठी तर  महायुतीचे नेते धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्या सह माजीमंत्री जयदत्त क्षिरसागर यांनी आजित पवार गटाचे उमेदवार योगेश क्षिरसागर यांना बळ देत बीड विधानसभा मतदार संघाची निवडणुक प्रतिष्ठेची केली होती,परंतु शेवटच्या फेरी पर्यंत ताणल्या गेलेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार संदिप क्षिरसागर हे 5500 मतांनी विजयी झाले आहेत,याच मतदार संघातुन शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा,आणि स्व.विनायक मेटे यांच्या पत्नीसह अपक्ष आनिल जगताप,महाराष्ट् स्वराज्य पक्षाकडून कुंडलिक खांडे आसे मिळुण मराठा समाजाचे 3 उमेदवार हि रिंगणात होते ,

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!