बीड

31 मार्च पर्यंत परतावा करणाऱ्या ओबीसी लाभार्थ्यांना 50 % सवलत

50% concession on interest for OBC arrears if paid by 31st March

ओबीसी लाभार्थ्यानां थकित व्याज रक्कम एकरक्कमी करण्यास 31 मार्च पर्यंत 50 टक्के सवलत

 वेगवान मराठी-बीड, दि. 6 (जि. मा. का.केशव मुंडे):- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई जिल्हा कार्यालय बीड यांच्यामार्फत बीड जिल्हयातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना व्यवसायासाठी अल्प व्याज दराने कर्ज वितरीत करण्यात आलेली आहे

त्यापैकी ब-याच लाभार्थ्यांची कर्ज परतफेडीची मुदत संपलेली असून थकित कर्ज वसुली होण्याच्या दृष्टीने ओबीसी महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणात संपूर्ण कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणा-या लाभार्थ्यानां थकित व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्यासाठी एकरक्कमी परतावा (OTS) योजना दि. 31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे.

त्यानुसार ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा घेऊन कर्ज मुक्त व्हावे व होणारी कार्यवाही टाळावी असे आवाहन ओबीसी महामंडळाचे व्यवस्थापक यांनी केले आहे

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!