मुलीच्या लग्नाचा बस्ता बांधायला निघालेल्या डोईफोडे कुटुंबावर काळाचा घात
Car accident of the Doifode family, who were going to the marriage ceremony of their daughter

वेगवान मराठी बीड -आज सकाळी शुक्रवार रोजी केज तालुक्यातील कासारी येथील कुटुंबाच्या गाडीचा मुलीच्या लग्नासाठी बस्ता बांधण्यासाठी नगर कडे जात असताना केज पासून जवळच असलेल्या सांगवी पाटी जवळ आज सकाळी भिषण अपघात झाला आहे
या घटणेत मुलीचे वडिल शाहुराव डोईफोडे व उर्मिला घुले मृत्यु झाल्याची दुर्दवी घटना घडल्याचे दुखदायक वृत आहे
तालुक्यातील कासारी येथील रामेश्वर शाहूराव डोईफोडे यांच्या मुलीचे लग्न 23 फेब्रुवारी ला होते. त्यामुळे मुलीचे वडील मुलीसह इतर नातेवाईकांना घेऊन गाडीने नगरला बस्ता बांधण्यासाठी जात होते.
परंतु काळाने घात केला आणि आज सकाळी आठच्या सुमारास ते केज बीड रोडवरील सांगवी पाटी जवळ पोहचले असता पुलाच्या वळणावर जीपचा आणि अन्य एका वाहनाचा अपघात झाला.
आणि यामध्ये मुलीचे वडील शाहुराव डोईफोडे आणि शिक्षक श्रीराम घुले यांच्या पत्नी उर्मिला घुले यांचे या घटणा मध्ये दुर्दैवी निधन झाले आहे
सदरील अपघाताची माहिती मिळताच तात्काळ जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे मात्र यामध्ये उर्मिला घले यांचे जागीच तर मुलीच्या वडीलाचे आंबेजोगाई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याची दुःखद माहिती समोर आली आहे
दरम्यान या घटणेमुळे डोईफोडे कुटुंबाच्या नातेवाईकांसह गावावर शोककळा पसरली असुण परिसरातील नागरिकां कडुण हळहळ व्यकत करण्यात येत आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.