क्राईममहाराष्ट्र

चंदु लाल बियाणी चे 12 लुगडे आणि सगळेच अंग उघडे

Chandulal Biyani's 12 rags and all the parts are open

चंदुलाल बियाणी आणि बद्रिनारायण बाहेती ची मालकी आसलेल्या राजस्थानी ग्रुपचा भोंगळा कारभार चव्हाट्यावर ! 

(पोदार ची फ्रेंचायझी गेल्याचे 4 महिण्यां पुर्वीचे जाहिर प्रगटण )

जे बंसल क्लासेसचे झाले तेच मल्टिस्टेट आणि पतसंस्थेत घडले व पोदार स्कुलच्या बाबतीत तर जे घडले आहे आणि घडत आहे त्याची इत्यंभुत माहिती सांगत बसले तर चंदु बियाणी रचित व बद्रिनारायण बाहेती प्रस्तुत आशा एका मोठ्या  पोदार महा पुराणाची निर्मिती होईल  !

वेगवान मराठीचे उप संपादक  केशव डी मुंडे यांनी ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष सेवकराम जाधव यांच्या कडुण घेतलेल्या अधिकृत माहिती नुसार 3 डिसेंबर 2024 चंदूलाल बियाणी न्यायालया समोर स्वतः होऊण शरण आलेला आहे, यामध्ये पोलीसांनी टिरी बडवुण घ्यायचा काडीमात्र संबध नाही !

18 डिसेंबर 2024 रोजी ठेवीदारां कडुण बंडू मुंडे व बी पी सिंग यांच्या चौकशी बाबत निवेदन – शेजाळ साहेब आयओ यांना सादर करण्यात आले !

यामध्ये प्रामुख्यानें प्रिंसिपल बीपी सींग व्यवसाथपक बंडु मुंडे हे आरोपी संचालकांच्या संपर्कात आसुण ते  आरोपींना फरार राहण्यासाठी शाळेतील रक्कम देऊण सहकार्य करत आसल्या बरोबरच शाळेतील व्यवहारात अफरातफर होत आसल्याचे नजरेस आणुन देण्यात आले होते…

परंतु पोलीस प्रशासणाने ज्या पद्धतीने दखल घ्यायला पाहीजे होती तशी न घेता ! शाळेतील व्यवहारांवर अंकुश न लावता थातुरमातुर चौकशी करुण सोडले तर फरार आरोपींना जेरबंद करण्या ऐवजी उलट गुन्हेगारांना रान मोकळे करुण दिले ! धन्य ते पोलीस प्रशासन आणि धन्य ते संचालक मंडळ , म्हणजे कसं तर एकमेकां आर्थिक साह्य करु अवघे खाऊ मड्यावरचे लोणी !

14 फेब्रुवारी 2025 हायकोर्टची पिटिशन तारीख़ होती अनेक त्रुटी ठेवुण आणि मालमतेची कसुण चौकशी न करता उपलब्ध 7/12 च्या आधारे आर्थिक गुन्हे शाखा बीड पोलीसांनी दाखल केलेल्या M P I D प्रस्तावावर हायकोर्टाने ताशेरे ओढत नव्याने एमपी आयडी प्रस्ताव सादर करण्याचे बीड पोलीसांना आदेश दिले

दिनांक 22 मार्च 20 25 रोजी पोद्दार शाळेत ठेवीदारां सोबत झालेल्या तोंडी करारानुसार एका वर्षातील जमा खर्चाचा लेखा जोखा मागण्यासाठी गेलेल्या ठेवीदारांना दिलेला शब्द फिरवत ठेवीदारांना उकसाऊण त्यांच्याशी हुज्जत घालण्याचे काम जाणुन बुजुन बिपी सिंग यांच्याकडुण करुण घेण्यात आले

दरम्यान या वेळी झालेल्या झटापटीचे रुपांतर थापड बुक्की मध्ये झाले आणि त्या नंतर दोन्ही बाजु कडुण गुन्हा दाखल न करण्याचे पोलीसां समक्ष ठरले परंतु दोन दिवसा नंतर कोणाच्या सांगण्या वरुण
24 मार्च रोजी ठेवीदारांवर गुन्हे दाखल करायला लावले ? याची पोलीसांनी चौकशी का केली नसेल ?

बरं एवढ्यावर समाधान न झाल्यामुळे बीड चे पोलीस आधिक्षक नवनीत कॉवत यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत ठेवीदारांना गप्प गार करण्याची मोठी बहादुरी हेपलली , परंतु  जेंव्हा 3 ते 4 वेळा ठेवीदारांनी नवनीत कॉवत यांची बीड मध्ये भेट घेऊन लेखी निवेदने दिले व तोंडी स्वरुपात दखल घ्यावी म्हणुन विनवणी केली आसता आठ दिवसात फरार संचालक आणि व्यवस्थापकांना अटक करतो आसे सांगीतले पण चार महिने उलटुण गेले तरी एसपी साहेबांना आणखी मुहुर्त सापडेना झाले आहे मग संशय तर येणारच what is the reasion

जि तत्परता क्षुल्लक कारणातील वादासाठी ठेवीदारांवर कारवाई करण्यासाठी दाखवली तशी दक्षता संचालकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दाखवली आसती तर समजुन घेतले आसते ! पण तब्बल दिड महिणा उपोषण,आंदोलन केल्यावर कुठे ते पण रात्रभर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्या नंतर कुठे गुन्हे दाखल करुण घेतले !

या उलट लातुर,सेलू,नांदेड,उदगीर ,जालन,संभाजीनगर या ठिकाणी मात्र विना संघर्ष करता संचालकांवर गुन्हे दाखल करुण घेण्यात आले ! मग बीड आणि परळी चे पोलीस बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान माणत नाहीत का ? का बीड हा वेगळा देश आहे ? कुछ तो गडबड है दया 

पोद्दार स्कुल ची प्रगती करण्या ऐवजी फरार संचलकांनी शाळेवर बसवलेल्या अपात्र लोकांनी केवळ पोद्दार स्कुलचे लचके तोडण्याचे काम केले आणि शाळेची वार्षिक रौयल्टी न भरता स्वताच्या तुंबड्या भरल्या आणि पोदार शाळेची राख रांगोळी करुण पार झोपाटा लाऊण टाकला

 

पोद्दार ब्रँड ची रॉयल्टी भरायची सोडून फरार संचलकांना पैसे पाठवले गेले, स्वतः चे खिसे बरण्याशिवाय दुसरं काहीही केल नाही

चार सहा महिन्याला वेगळा मालक नियुक्त केल्या गेला

चंदूलाल बियाणी, जगदीश बियाणी, बद्रीनारायण बाहेती, धीरज बाहेती, बियाणी यांनी वेगवेगळ्या लोकांना अधिकार दिले

लाज लज्जा इज्जत वेशीवर टांगुन धिरज,आणि बद्रिनारायण ठेवीदारांचे पैसे बुडवुण मौज मज्जा मारत फिरताना 

ठेवीदारांच्या पैशातून उभ्या राहिलेल्या पोदर शाळेच्या माध्यमातून प्रत्येकाने आपापले खिशे भरून फरार राहण्याच्या कामी संचालकांना पैसे पुरवून मदत केली. आरोपिंना मदत करणारा सुद्धा आरोपीच असतो.मग हा नियम यांना लागु होत नाही का हो नवनीत कॉवत साहेब ? यांच्यावर कारवाई कधी करणार आहात ?

ठेवीदारांवर गुन्हे दाखल करणारे प्रशासन 300 कोटींच्या ठेवी बुडवून पळून गेलेल्या हरामखोरांना अटक का करू शकत नाही.आसा उद्गिग्न सवाल पिडीत ठेवीदारां कडुण विचारला जातोय ?

पोद्दार शाळेवर आता पर्यंत झालेल्या व्यवस्थापकांच्या नियुकत्या आणि त्यांचे कारणामे 

1 परळीतील राजकीय क्षेत्रातील नाव असलेले आणि चंदुलाल बियाणी सोबत आर्थिक व्यवहार व पारीवारीक घनिष्ठ संबद्ध असलेले दिपक नाना देशमुख यांची नियुक्ती चंदु बियाणी यांनी केली

दोन महिण्याच्या आत प्रिंसिपल बीपी सींग आणि दिपक देशमुख यांचे वाजायला सुरु झाले पुढे बियाणी परीवारा सोबत हि संबंध बिघडले ! याच घडामोडीत शाळेतील 9 लाख रुपये दिपक देशमुख यांनी बिपी सिंग ला धमकाऊण घेतल्याची माहिती बिपी सिंग यांच्या कडुण सांगण्यात आली

2 गंगाखेड येथील व्यवसायिक व राजकारणी व बियाणी परिवाराची माणसकन्या मंदाकिनी बंडु मुंडे यांची आणि परळीतील नामांकित व्यापारी आशोक जैन यांची नियुक्ती धिरज बाहेती यांच्या सही शिक्यानिशी ईमेलद्वारे करण्यात आली  ! इथे पण तेच पहिले पाढे वाचण्यास सुरुवात झाली प्रिंसिपल बीपी सींग आणि बंडु मुंडे यांच्यात आर्थिक देवान घेवाणी वरुण आणि कारभार करण्यावरुण खटके उडायला सुरुवात झाली !

मास्टरमाईंड आशोक जैन 

बिपी सिंग यांने संचालक आणि पोलीसी ताकद लाऊण बंडु मुंडे यांना शाळेवर येण्यास प्रतिबंध घातला आणि बंडु मुंडे यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी मंदाकिनी मुंढे यांनी कारभार पाहवा आशी सोय करुण घेतली !पण हळुहळू या दोघांचे ही बिनसले यावेळी पहिल्याप्रमाणेच दोघांकडूनही एकमेकांवर आर्थिक अफरातफरीचे आरोप प्रतिआरोप करण्यात आले

मुंडे परिवार बिपी सिंग याने दिड ते दोन कोटीचा डल्ला मारल्याचे आरोप करत आहे तर बिपी सिंग मुंडे परिवारांने 40 लाखाच्या आसपास रक्कम बळकावल्याचे आरोप करताहेत ,यामध्ये आशोक जैन थोडाच संत महात्मा आहे सर्वात पावरफुल आणि या सिंडीकेटचा बादशा तर खरा हा अशोक जैनच आसुण इतरांना तो कठपुतली प्रमाणे आपल्या इशाऱ्यांवर नाचवत आहे

यातच आता आठ महिणे मुंडे कुटुंबास समोर करुण दिवस काढल्या नंतर त्यांचाही पद्धशीर पणे करेक्ट कार्यक्रम करुण आशोक जैन यांने आता तर चक्क पोदार शाळाच विक्रीस काढली आसुण परळी येथील जुन्या पिढीतील नामांकित ड्रौ.हरिशचंद्र वंगे आणि बंसल क्लासेस चे व्यवस्थापक कैलास घुगे,यांना विकण्याची सगळी तयारी करुण टाकली आहे

या शाळेच्या मालमतेवर परळीसह मराठवाड्यातील अनेक जन डोळ ठेऊण आहेत ; 

आगदी सुरुवातीला चर्चा होती वाल्मिक कराड यांनी शाळा विकत घेतल्याची परंतु पुढे ति चर्चा आपोआपच हवेत जिराली , नंतर एक नाव पुढे चर्चिले गेले की परभणी तील एक मोठ्या नेत्या यासाठी इच्छुक आहेत ,या बरोबरच उस्मानाबाद बैंकेचे चेअरमन नाग्दे साहेब आणि त्यांचे आर्थिक सल्लाहागार समीर पटेल आणि स्वतः आशोक जैन हे नावे देखील चर्चेत होते…

एवढा सगळा सावळा गोंधळ सुरु आसताना बिचारा ठेवीदार मात्र चातक पक्षाप्रमाणे आपल्या ठेवी कधी पदरात पडणार याची भोळी आस लाऊण वाट बघण्या पलिकडे काहीच करत नाही !

तेंव्हा एक पत्रकार आणि देशाचा नागरिक म्हणून मला हा प्रश्न पडतो की संविधान सोडले तर  कायदे,नियम,पोलीस,न्यायालय,लोकप्रतीनिधी,हे केवळ धनदांडग्यांच्या हितासाठीच आहेत का ? जे पिछले आहेत जे कर भरतात,कष्ट करतात,ज्यांचे लेकरं सिमेवर देशासाठी बलिदान देतात जे देशाचा प्रमुख कणा बणुन आपले सर्वस्व अर्पण करतात त्या सामान्य नागरीकांचे काय ?

सध्यास्थिती पाहता ठेवीदारांची माणशीक स्थिती बरोबर नसुण अनेक वृद्ध ठेवीदारांचे मानसिक संतुलन बिघडले आहे ! सेवकराम जाधव यांच्या माध्यमातुन ठेवीदार कृती समिती ठेवीदारांना सावरण्याचा प्रयत्न करत आहे,

परंतु आता त्यांचे देखील ऐकुण घेण्याची ठेवीदारांची मानसिकता शिल्लक राहिलेली नाही ! एक वर्ष पोदार शाळेचे संगोपान केले विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ठेवीदारांनी आगदी संयम ठेऊण स्कुल व्यवस्थपानास सहकार्य केले 

परंतु शाळा बि गेली आणि पैसे बी गेले ठेवीदारांच्या नशीबी परत एकदा निराशा हाती आली आहे ,त्यामुळे इथुन पुढे होणाऱ्या परिणामास संचालक मंडळासह पोलीस प्रशासन जबाबदर राहिल 

लोकप्रतिनीधीने ठेवीदारांना वाऱ्यावर सोडुण दिले आहे तर पोलीस प्रशासन आरोपीनां बळ देण्याचे पाप करत आहे.आणि स्थानिक चे धन दांडगे व कर्जदार वाहत्या पाण्यात आपला हात धुऊण घेण्याची संधी शोधत आहेत. 

यातच आता ठेवीदार स्वताहुण एसपी कार्यालया समोर सामुहिक अमरण उपोषणाची भाषा बोलु लागले आहेत एकंदरीत काय तर ठेवीदारांचा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे …

✒️ KESHAV D.MUNDE -8888387622-WEGWAN MARATHI PARLI BEED 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!