क्राईममहाराष्ट्र

साक्षी विटेकर ची ह्रदय पिळवटुण टाकणारी करुण कहाणी

The heartbreaking story of sakshi viteker, a girl

दिनांक: 19/04/2025 वेगवान मराठी बीड प्रतिनिधी के.डी.मुंडे _19 एप्रिल २०२५ शनीवार रोजी हळदीचा कार्यक्रम,तर आज रविवार रोजी 20 एप्रिल २०२५ रोजी विवाह सोहळा पार पडणार होता ,परंतु नियतीने साक्षी च्या नशिबात बैल्कमेलींग,व्हिडिओ,फोटो चा आधार घेऊण क्रुर  अत्याचार,बलात्कार,विनयभंग,आणि आत्महत्येचे ताट वाढुण ठेवले होते …

हवाई सुंदरीचे स्वप्न पाहणाऱ्या साक्षी चा इतका दुर्दैवी अंत होईल आसे स्वपन्नात हि कल्पना न केलेल्या परिवाराची मुख्यमंत्री,किंवा पालकमंत्री यांच्याकडे नाही तर चक्क फक्त एकनाथ शिंदे यांच्या कडुण न्यायाची अपेक्षा करणारे ह्रदयस्पृशी पत्र…

प्रति,मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य, मुंबई.

सन्माननीय महोदय,

साहेब, मी तुमची लाडकी बहीण तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि राज्यातल्या अस्वस्थ झालेल्या बहिणींना आधार मिळाला. आपण मुख्यमंत्री असताना आपल्या म्हणजेच आम्हांसारख्या अगणित बहिणींना भावाचा बंध मिळाला. मी नाराज आहे, आज आपण उपमुख्यमंत्री आहात. मात्र माझ्यासाठी तुम्हीच लाडक्या बहिणीचे मुख्यमंत्री आहात.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालत आनंद दिघे साहेब यांची प्रेरणा घेऊन आपण राज्याचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवशाही प्रमाणे हाताळत आम्हाला न्याय दिला.

आम्ही त्याबद्दल ज्ञात आहोत. परंतु आज आम्हाला तुमची कमतरता भासते. माझी मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचे होते. मात्र एका क्षणात ती नाहीशी झाली.

काही मुलांनी तिची छेड काढली आणि साहेब, तुमच्या लाडकी बहिणीच्या मुलीने गळफास घेऊन जीवन संपविले. साहेब, आम्ही आस धरुन आहोत. तुमची भाची साक्षी या जगात परत येणार नाही,

हे आम्हाला देखील माहित आहे. मात्र त्या क्रुर नराधमांना देखील तेवढीच शिक्षा होणे अपपेक्षित आहे.

आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एका कार्यक्रमानिमित्त आमच्या बीड जिल्ह्यात आले. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

सर्वांना माहित आहे, आपण असला असता तर पिडित बहिणीला भेटल्याशिवाय गेला नसता. याची प्रचिती महाराष्ट्राला आणि लाडक्या बहिणींना आहे.

साहेब, बीड मध्ये केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर (KSK) महाविद्यालय आहे, याच महाविद्यालयात कला शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होती.

काही मुलांनी तिची छेड काढली, तिला ब्लॅकमेल करुन तिच्यासोबत अनैतिक कृत्य केले. जबरदस्ती व्हिडीओ आणि फोटो काढण्यात आले,

या अत्याचाराला असाह्य होवून साक्षीने मामाच्या घरी धाराशिव येथे जावून गळफास घेत आत्महत्या केली.

आम्ही बीडचे रहिवासी आहोत, आरोपी देखील बीडचाच राहणारा आहे. माझ्या मुलीने मामाच्या गावी म्हणजेच धाराशिव येथे असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे तो गुन्हा धाराशिव सिटी पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे.

शिंदे साहेब, तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता यावर आम्हाला ठाम विश्वास आहे. यात अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केले आहे.

धाराशिव येथील पोलिस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी आमचा कसलाही जबाब घेतला नाही. उलट आम्हाला अपमानित केले.

आम्हाला तासंतास कार्यालयाबाहेर बसविण्यात आले. (आम्हाला ताटकळत बसविले याचे सी.सी.टी.व्ही. कॅमेरात कैद आहे). आरोपीची बहिण देखील यात आरोपी आहे, मात्र ती पोलिस दलात कार्यरत असल्याने धाराशिव पोलिस आम्हाला कसलीही मदत करत नाहीत.

ज्या आरोपी मुलाने छेडखानी केली, माझ्या मुलीला ब्लॅकमेल केले त्याच्या मोबाईल मधील केलेली चॅटिंग पोलिसांनी अद्याप उघड केली नाही.

याच दरम्यान के. एस. के. महाविद्यालयातील इतर दोन मुलींनी देखील छेडखानीला कंटाळून आत्महत्या केली. आरोपी मुलाचे बीड शहरातील गुंडांशी संबंध असल्याने कोणताही पालक पुढे येऊन फिर्याद देत नाहीत.

या गुंडांची दहशत पाहता आम्ही कोणाला न्याय मागायचा हा प्रश्न पडला आहे.

साहेब आपण मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री असला असता तर या गुंडांचा खात्मा करुन आम्हाला न्याय दिला असता,

आताही केवळ तुमच्याकडूनच आम्हाला न्यायाची आस आहे, आपण आम्हाला न्याय देऊंन गुंडांना शिक्षा द्याल एवढीच अपेक्षा आहे.

आपलीच लाडकी बहीण – कोयना सतीश विटकर.रा.पालवन चौक,बीड ता.जि.बीड मो.नं. 7972710048

K.D.MUNDE-wegwan marathi news media network india 8888 387 622

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!