बीड जिल्ह्यातील युवक नाशिक येथील गोदावरीच्या पात्रात गेला वाहुण
A youth from Parli went into the riverbed of Godavari in Nashik.

बालाजी रामभाऊ मुळे वय २७ रा.नांदगाव जि.बीड येथील युवक कुटुंबासोबत धार्मिक विधीसाठी गेला आसता नाशिक येथील गोदावरी नदी मध्ये वाहुण गेल्याची प्राथमिक माहिती आहे..
वेगवान मराठी प्रतिनिधी परळी-बीड 30 /4 /25 नाशिक येथील गोदावरी पात्रात सध्या मोठ्या प्रमाणात पानवेलींचे जाळं तयार झालं असून, त्या पानवेलीत हा तरुण अडकलेला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गउइ च्या सहाय्याने नदीतून पानवेली हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून शोधमोहीम सुरु करण्यात आली असून, प्रवाहातील प्रत्येक संभाव्य भागाची तपासणी केली जात आहे.
नाशिकच्या पवित्र रामकुंडावर गेलेल्या तरुणाचा पाय घसरून तो गोदावरी नदीत वाहून गेला. गोदावरी पात्रात सध्या १ हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे प्रवाह तीव्र असल्याने तरुण क्षणार्धात वाहून गेला.
सदरील घटना घडल्यानंतर प्रशासन व स्थानिक आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम राबवण्यात आली मात्र अंधार आणि प्रवाहामुळे अडचणी आल्या आणि तरुणाचा काहीही शोध लागला नाही.
यामुळे मंगळवारी सकाळपासून पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. गोदावरी नदीच्या पात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर पानवेली वाहून आल्या आहेत.
त्या पानवेलीत हा तरुण अडकला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर पानवेली हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या कामासाठी जेसीबी यंत्राचा वापर करण्यात येत असून, आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलीस दल घटनास्थळी कार्यरत आहेत.
दरम्यान या घटनेमुळे नाशिक येथील रामकुंड परिसरात भीतीचं वातावरण आहे. श्राद्धपक्ष असल्याने गोदावरी घाटावर मोठी वर्दळ आहे.
या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नदी पात्रात उतरणे टाळावे, पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे…
✒️KESHAV D MUNDE 8888 387 622 WEGWAN MARATHI NEWS NETWORK

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.