बीड ब्रेकींग-दोन बालविवाह रोखण्यात पोलीसांच्या एएचटीयु पथकास यश
Police AHTU team succeeds in preventing two child marriages in Beed

बीड मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस एएचटीयु बीडच्या पोलीस पथकामुळे दोन बालविवाह रोखले ! अन्यथा दोन चिमुकल्या मुलींची झाली यातुण सुटका
AHTU बीड, पथकाने रोखले एकत्र होणारे दोन बालविवाह.
वेगवान मराठी लोकप्रतिनिधी केशव डी मुंडे बीड-22.5 .2025 रोजी, पोलीस स्टेशन बीड ग्रामीण हद्दीत पांगरबावडी या गावी सखाराम मोगलाजी संकोड, व गंगाराम गंगाधर अनारसे यांचे घरी एकत्र दोन बालविवाह होत असल्याचे गोपनीय माहिती ATHU पथकास मिळाली होती,
त्या नुसार AHTU पथकाने सदर ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते व पांगर बावडी गावाचे बालविवाह अधिकारी यांनी भेट दिली असता लग्नातील दोन्ही नवरी मुली अल्पवयीन मिळून आल्या,
शिक्षणाचा अभाव, भटके जीवन, तसेच कायद्याबद्दलचे अज्ञान, तरुण मुलींना वयात आल्यानंतर सांभाळायचे कसे?अशी अनेक कारणांमुळे मुलीचा विवाह लावत असल्याचे पालकांनी सांगितले,
दोन्ही कडील आई वडील नातेवाईक, यांना AHTU पथकाने कमी वयातील लग्नामुळे मुलींच्या शरीरावर होणारे गंभीर परिणाम, लहान वयात पडणाऱ्या जबाबदाऱ्या,
कुपोषित अपत्य, शिक्षणाचे महत्त्व अशा सर्व समुपदेशन करून मुलीचा विवाह अठरा वर्षे झाल्याशिवाय लावून देणार नाही, असे हमीपत्र घेवून सदरचे दोन्ही बालविवाह रोखण्यात आले,
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.नवनीत कॉंवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली
AHTU पथक प्रमुख API वर्षा व्हगाडे, पोलीस अंमलदार अशोक शिंदे, प्रदीप येवले, मनीषा खरमाटे, रूपाली टोणे,यांचेसह बालविवाह अधिकारी ग्रामसेवक एस. बी. सपकाळ, व सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी केली.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








