बीड

शेतकऱ्यांसाठी बीडच्या पोलीस अधिक्षकांचा ऐतिहासिक निर्णय

Commendable initiative of Beed Police Superintendent for farmers

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड दि. 16/06/2025 : “पोलीस आपल्या बांधावर” पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांचा अभिनव उपक्रम …

यावर्षी मान्सुन पुर्व पाऊस पडला असून शेतीत मशागतीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु झालेले आहे. दरवर्षी अशा कालावधीत शेती, शेतीचा बांध, शेतीचा मालकी हक्क अशा कारणावरून शेतकऱ्यामध्ये वादविवाद सुरु होत असतात.

सदर वादाची वेळीच दखल न घेतल्यास त्याच्यात वादविवाद होवून दखलपात्र गुन्हे घडतात.

अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांचे संकल्पनेतून बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस आपले बांधावर उपक्रम सुरु करण्यात येत आहेत.

सदर उपक्रमाबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस अधीक्षक यांनी पुढील प्रमाणे सुचना दिल्या आहेत.

1. शेतीचे बांधावरून शेतकऱ्यांमध्ये वादविवाद होवून सदर तक्रारदार पोस्टेस येताच पो. ठा. अधिकारी यांनी तक्रारदार यांचेकडे सहानुभुतीपर्वक विचारपूस करावी.

2. तक्रारदार यांचेकडे विचारपूस करून त्याप्रमाणे तक्रार नोंदविले वरून संबंधीत बीट अधिकारी व बीट अंमलदार यांना अवगत करावे.

3. बीट अधिकारी व बीट अंमलदार हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे बांधावर जावून झाले प्रकाराची खात्री करावी

4. गावातील प्रतिष्ठीत इसम, तंटा मुक्तीचे अध्यक्ष, शेताशेजारील शेतकरी यांचेकडे विचारपूस करून तक्रारदार यांना आवश्यक कायदेशीर मार्गदर्शन करावे.

5. सदर प्रकरणामध्ये बीट अधिकारी/अंमलदार हे आवश्यकतेनुसार प्रभावी प्रतिबंधक कारवाई करतील.

या उपक्रमातून मुख्यतः मोठ्या गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस विभागाकडून केला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना होणारे आर्थिक नुकसान यास प्रतिबंध बसणार आहे.

योग्य त्या कायदेशीर मार्गदर्शनाच्या अभावी शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यातून टळणार आहे.

अशा प्रकारच्या प्रकरणांचा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष आढावा घेण्यात येणार आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!