राजस्थानी ग्रुपच्या सर्वच मालमत्तेवर कोणत्याही ऐऱ्या गैऱ्या नथु खैऱ्यांची नाही तर ठेवीदारांचीच कायदेशीर मालकी !
Legal ownership of Rajasthani property belongs to the depositors.

® ठेवीदार कृती समिती ची भुमिका आणि राजस्थानी ग्रुप संदर्भातील ठळक घडामोडी 👇

© राजस्थानी ग्रुपच्या पोदार स्कुल स्थित मालमत्ते मध्ये ठेवीदारांच्या घामाच्या ठेवींची गुंतवणूक करण्यात आली आहे आणि सदरील मालमत्ता एमपीआयडी प्रस्तावा मध्ये समाविष्ट आहे !
® त्यामुळे या मालमत्तेवर कोणत्याही ऐऱ्या गैऱ्याने आणि नथु खैऱ्याने अधिकार गाजवायचा नालायकपणा करु नये ! ठेवीदार कृती समितीचा शाळेला विरोध कधीच नव्हता आता हि नाही आणि भविष्यात देखील शाळे सह विद्यार्थी आणि पालकांच्या हिताचीच भुमीका कायम असेल यात शंका घ्यायचे कारण नाही !
© परंतु याचा अर्थ आसा नाही की शाळेच्या आडुण होणाऱा आर्थिक व्यवहार,किंवा शाळेची वास्तु आणि सदरील मालमत्तेचा उपभोग हा ठेवीदारांच्या परस्पर बापाची जहागीरी समजुन घेता येईल किंवा सर्व्हे नं 90 मधिल स्थावर मालमत्ता विकून स्वतः चे थडगे भरता येईल…
तर हा केवळ तुमचा भ्रम आहे ,आणि तो नालायकापणा करण्याच्या फंदात कोणीही पडु नये ! जो पर्यंत ठेवीदारांच्या ठेवी परत दिल्या जात नाहित तो पर्यंत केवळ पोदार स्कुलचीच मालमता नाही तर राजस्थानी ग्रुपची सर्व मालमता
तसेच संचालक मंडळांच्या नावा वरील मालमता आणि व्यवस्थापकाच्या मालमतेसह रोख रक्कमेवर देखील केवळ आणि केवळ ठेवीदारांचा निर्विवाद आधिकार आहे थोडक्यात काय तर या मालमतेची मालकी हि ठेवीदारांची आहे व ति पण कायदेशीर मार्गाने !
वरील बाबींचा विचार करुन कोणीही या मालमतेला खेटण्याचा प्रयत्न करु नये आणि जर केलाच तर मग तो अशोक जैन आसो,बद्रिनारायण बाहेती आसो,नाही तर कोणीही कुठला तिसमारखांन आसो !
दहशत,दादागिरी,आणि पैशाचा माज दाखविण्याचा बालिश प्रयत्न कराल तर ड्रा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गाने ठेवीदार कृती समिती कडुण त्यांचा माज उतरविण्यात येईल !
त्यामुळे इथुन पुढे कोणत्याही भामट्यांनी ठेवीदारांच्या मालमतेवर कब्जा किंवा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतानी हजारदा विचार करुन पाऊल टाकावे कारण यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही
शाळेची बिल्डिंग लिजवर देण्याचा त्या बिल्डिंगला विक्रीस काढण्याचा, सदरील मालमत्तेचा उपभोग घेत किराया घेण्याचा आणि जैनांच्या अशोकाचा काडीचा हि संबंध नाही !
जैनेश्वरांनी ठेवीदारांच्या, प्रशासकाच्या आणि बियाणी व बाहेतीच्या परस्पर सदरील मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जा केलेला आहे
परळी चा महामंडलेश्वर जे पेपर दाखवत आहे ते फ्रौड आसुण ज्या 3 कोटीचा खुळखुळा अशोक जैन वाजवत आहे ति सरळ सरळ ठेवीदार आणि प्रशासणाच्या डोळ्यात धुळफेक आहे ! कारण मिळालेल्या माहिती नुसार त्या 3 कोटीच्या बदल्यात बियाणी व बाहेती यांनी शाळेच्या जमिणीतीलच 3 एकर जमीन या आगोदरच जैनांच्या अशोकाला दिल्याचे बियाणी कडुण वारंवार सांगीतले जात आहे
प्रशासका कडुन अधिकृतपणे शाळेच्या प्रिंसिपलला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आसुण आठ दिवस उलटले तरी अजुनही स्कुल व्यवस्थापना कडुन याचे उत्तर देण्यात आलेले नाही हा जैनाचा आणि त्याच्या बगलबच्च्यांचा माज नाही तर काय आहे ?
¶ काही ठळक घडामोडी ¶
ठेवीदारांना चुना लावून फरार झालेल्या बाहेती दाम्पत्यास नांदेड पोलिसांकडून अटक
( ठेवीदार कृती समितीच्या शिष्टमंडळाला पाहुण तोंड लपवत आसताना बाहेती दांपत्याचे नांदेड येथील न्यायालय परिसरात वेगवान मराठी ने टिपलेले छायाचित्र 👇)

ठेवीदार कृती समितीने नांदेडचे पोलीस अधीक्षक व तपास अधिकारी यांचे मानले आभार
3 कोटीच्या ठेवींसाठी नांदेड पोलीसांनी जमीन अस्मान एक करुण बाहेती कुटुंबाला गरुडाने झडप मारुण ऊंदराची शिकार करावी आसे अलगद उचलुन आणले…परंतु मागील दोन वर्षापासून बीड पोलीसांना राजस्थानीचा एक हि संचालक सापडु नये यापेक्षा दुर्दैव्य काय ?
जर बीडची पोलीस इतकी कमजोर आणि लाचार असेल तर त्यांनी अंगावर चढवलेली वर्दी उतरवुण काहींनी नेत्यांचे कार्यकर्ते व्हावे तर काहिनीं वयात अलेल्या अल्पवयीन लहान सहान तरुणांना गोळा करुण रोडमारी,हाफ्तेवसुली च्या गैंग तयार कराव्यात
दिनांक-18 जुन 2025 परळी वैजनाथ-नांदेड :– वेगवान मराठी चे उपसंपादक -केशव डी मुंडे यांनी राजस्थानी ग्रुप च्या चालु घडामोडी व ठेवीदार कृती समितीच्या कार्याचा घेतलेला आढावा आणि कृती समिती ने मांडलेली भुमीका यावर आधारित लिहलेला संपादकीय लेख….
परळी येथील ठेवीदार कृती समितीने मागील दोन वर्षा पासून सतत खेटे मारत आरोपींचे सर्व डिटेल्स देऊण देखील बीडच्या पोलीस प्रशासनास राजस्थानी मल्टिस्टेट च्या एकाही फरार आरोपीस अटक केले नाही.
परंतु जिल्ह्यात सर्वात कमी ठेवी असुण देखील नांदेड पोलीसांनी एकाच भेटीमध्ये घटणेचे गांभिर्य पाहता आणि ठेवीदारांची व्यथा पाहुण बाहेती दाम्पत्यांस पकडुण सर्वोत्तम कामगिरी केली आहे.या घटणेची बीड पोलीस प्रशासनास थोडी तरी शर्म वाटेत आसेल तर उर्वरित फरार आरोपींना अटक करावे अन्यथा किमान गोरगरीब जनतेवर मोकळा रुबाब तरी झाडु नये
पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशावरुन आर्थिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस निरक्षक श्री एन. बी. कुंडगीर साहेब यांनी इचलकरंजी येथुन आर्थिक गुन्हे शाखेची टिम सोबत घेऊन रातोरात राजस्थानी मल्टिस्टेट व पोदार स्कुल चा सचिव
व या प्रकराणातील प्रमुख आरोपी असलेल्या बद्रिनारायण बाहेती व प्रेमलता बाहेती यांना अटक करुण नांदेड येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
नांदेड येथील न्यायालया समोर आरोपीची बाजु मांडतानी बाहेतीच्या वकिलाकडुण मोठा गौप्यस्फोट
दरम्यान सुनावणी च्या वेळी बद्रिनारायण बाहेती च्या वकिला कडुण मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आसुण न्यायालया समोर बाहेती ची बाजु मांडतांनी बीड जिल्ह्यातल्या तपास आधिकाऱ्यांनेच बद्रिनारायण बाहेती यांना परळी सोडुण फरार होण्यास सांगीतल्याचा दावा केला आसुण या विषयावरुण बीडच्या आय ओ च्या कामगीरीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आसुण नविन वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे..

या सर्वोत्कृष्ट कामगिरी बद्दल ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष सेवकराम जाधव सर यांच्या नेतृत्वात कृती समितीच्या शिष्टमंडळाने नांदेड येथील पोलीस अधिक्षक कार्यालयात जाऊण एसपी अविनाश कुमार यांची भेट घेत त्यांचे व श्रि कुंडगीर साहेबांचे आभार व्यक्त केले.
यावेळी वेगवान मराठी चे उपसंपादक पत्रकार केशव मुंडे, बाबासाहेब पांचांगे सर, मिलिंद क्षिरसागर,परमेश्वर दहिफळे,सुधीर देशमुख साहेब,नारायण लाल झंवर सेठ ,नंदकिशोर साबु हे ठेवीदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान मानणीय एसपी साहेबांनी स्थानीक नागरीकांना थांबवुण परळीहुण आलेल्या बीड जिल्ह्यातील ठेवीदारांना आगोदर भेटीसाठी बोलावुण घेत आस्थेवाईकपणे संपुर्ण व्यथा ऐकुण घेतली आणि कायद्याच्या चौकटीत जे जे शक्य असेल ते करण्याचे सांगत आरोपींवर योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली.
✒️ केशव डी मुंडे -वेगवान मराठी मिडीया समुह 8888 387 622


केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








