शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन, देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार
शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन, देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार

वेगवान मराठी / अरुण थोरे
नाशिक, ता. 6 जून 2024- देशातील राजकारणात मोठी घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, महाविकास आघाडीचे तथा इंडिया आघाडीचे शरद पवार यांनी नितीश कुमार यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे.
बिहार राज्याचे नीतीश कुमार सध्या एनडीए सोबत असून देशातील लोकसभेचा संपूर्णपणे निकाल स्पष्ट झाल्यास देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या एनडीए 295 जागांवर आघाडीवर असून इंडिया आघाडी 230 जागांवर आघाडीवर आहे अपक्ष व इतर उमेदवार हे 20 जागांवर आघाडीवर आहे. या सर्वांचा विचार करता शरद पवार इंडिया आघाडीसाठी राजकीय जुळवाजुळव करत तर नाही ना अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आला आहे.
नितीश कुमार व शरद पवार यांच्यात नेमकं काय बोलणं झालं याबाबतची अधिकृत माहिती अजून तरी समोर आली नाहीये मात्र लोकसभेच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडेल का हे पाहणं मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपने स्वबळाचा आकडा अजूनही गाठला नसल्याने भाजपच्या गोटात चिंता पसरल्याच सांगितले जात आहे. अजुनही १२५ जागांचे निकाल स्पष्ट होणार असुन त्या जागांवर ५ ते ६ हजार जागांची आघाडी- पिछाडी असल्याचं सांगितलं जातं असल्याने देशात मोठी खळबळ उडण्याची शक्यता.
