छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतरदार संघाचे खासदार कोण? खैरे ,भुमरे की जलील

विजय चौधरी-छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात यावेळी चुरस निर्माण झाली असून महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना खासदारकीची उमेदवारी दिली असून महायुतीचे शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांना तर एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली आहे त्यामूळे छत्रपती संभाजीनगर मतदार संघात तिहेरी लढत बघायला मिळत आहे
2019 च्या लोकसभा निवडणूक शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पराभूत झाले होते तर बहुजन वंचित पक्ष व एमआयएम पक्षाचे युती असलेले उमेदवार इम्तियाज जलील निवडून आले होते 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या होता त्यामुळे चंद्रकांत खैरे यांना मत विभाजनाचा फटका बसला होता त्याचाच फायदा बहुजनवंचित व एमआय युतीचे उमेदवार इम्तियाज जलील निवडून आले होते यावेळी चंद्रकांत खैरे , संदीपान भुमरे यांच्यात मतविभाजन होऊन पुन्हा एकदा एमआयएमचे खासदार छत्रपती संभाजीनगर मतदार संघात बाजी मारतात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र १ तारखेला दिलेल्या विविध माध्यमांच्या पोल मधून छत्रपती संभाजीनगर मधून महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे निवडून येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने या ठिकानी चंद्रकांत खैरे पुन्हा खासदार होणार असल्याचे बोलल्या जात आहे
माजी खासदार व जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे( उद्धव ठाकरे शिवसेना लोकसभा उमेदवार
इम्तियाज जलील (MIM पक्ष औरंगाबादचे माजी खासदार यांच्यात चुरशीची लढत तर महायुतीचे शिंदे गटाचे संदीपान भुमरे व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हेही औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे उमेदवार
चंद्रकांत खैरे व इम्तियाज जलील यांच्यात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे
