क्राईम

छत्रपती संभाजीनगरमध्ये अवतरला “गब्बर” शंभर लोकांची गॅंग घेवून आला जन्माला

वेगवान मराठी/विजय चौधरी

छत्रपती संभाजीनगर: काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा गब्बर चित्रपट प्रचंड गाजला होता. ज्यात अक्षय कुमार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या करून त्यांना भर चौकात लटकवतो. आता असाच गब्बर छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सोशल मीडियावर अशाच एका गब्बरचं पत्र व्हायरल होत आहे. ज्यात आपण शंभर लोकांची गॅंग तयार केली असून, लवकरच संभाजीनगर मधील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांचा हत्याकांड करणार असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे हे भर चौकात करणार असल्याचा दावा देखील या पत्रात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्वतःला गब्बर सांगणाऱ्या या व्यक्तीने ‘ रिश्वत मत लेना वरना गब्बर आ जायेगा’ असा उल्लेख देखील पत्रात केला आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये या गब्बरची जोरदार चर्चा असून हा गब्बर कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!