ट्रकच्या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर

वेगवान मराठी/विजय चौधरी
छत्रपती संभाजीनगर : स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करुनही दखल न घेतल्यानं धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. सुसाट ट्रकने दाम्पत्याला उडवलं. भरधाव ट्रकने आधी धडक दिली आणि त्यानंतर जवळपास 15 फूट फरफटत नेलं. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला आहे.नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक झालेला आकाशवाणी चौक ओलांडताना सुसाट ट्रकच्या धडकेत अनिता यतीराज जागीच ठार झाल्या. रात्री ७.४५ ला हा अपघात झाला. अनिता पती यतीराज यांच्यासह महेशनगरकडून आकाशवाणीच्या दिशेने रस्ता ओलांडत होत्या.महेशनगर येथील एका नातेवाइकाच्या उत्तरकार्यासाठी बाहेती दाम्पत्य आले होते. या दरम्यान त्यांचा रस्त्यावरुन चालत असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे
