क्राईम

नांदेड – रेल्वेला भीषण आग, आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

वेगवान मराठी 

नांदेड, 26 डिसेंबर 23 महाराष्ट्रातील नांदेडजवळ पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेनला आग लागल्याची  घटना घडली आहे.  अग्निशमन दल आणि परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. ही घटना कोणत्या कारणामुळे घडली याचा शोध घेण्याचे काम अधिकारी करत आहेत.

दक्षिण मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली.

नांदेड मेंटेनन्स यार्डमध्ये “लगेज-कम-गार्ड व्हॅन  कोचमध्ये आग लागली. आग लागल्यानंतर 30 मिनिटांत ही आग यशस्वीपणे आटोक्यात आणण्यात आली आणि इतर कोणत्याही डब्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!