बीडराजकारण

मुंडे साहेबांच्या प्रतिस्पर्धी घराण्यांची पुन्हा घर वापसी

same matter same time same day

केशव मुंडे वेगवान मराठी परळी 

दिनांक 25.ऑक्टोंबर आज बीड जिल्ह्यातील  राजकीय क्षेत्रात दोन घटना विशेष घडल्या त्यातील पहिली घटणा म्हणजे बीडच्या राजकारानातील गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर विरोधक बाबुराव आडसकर यांचे चिरंजीव रमेश आडसकर यांनी पंकजा मुंडे यांच्या नेत्रत्वा मध्ये एक दशक सोबत काम केल्या नंतर कोणतीही तक्रार किंवा नाराजी व्यक्त न करता शरद पवार यांच्या हास्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला ! साहाजिकच हा प्रवेश माजलगांव मतदार संघातील उमेदवारीसाठी आहे हे सर्वश्रुत आसुण ते लपुण राहिलेले नाही कारण सध्या परस्थितीला बीड जिल्ह्यात तुतारी ला चांगले दिवस आहेत परंतु रमेश आडसकर यांच्यासाठी हि निवडणूक सोपी नसणार आहे एकिकडे प्रकाश सोळंके यांचे तगडे आव्हाण तर दुसरीकडे ओबीसी मतांचा रोष यातच बाबरी मुंडे आणि माधव निर्मळ यांनी प्रचारात घेतलेली आघाडी आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद बघता ,प्रकाश सोळंके,मोहन जगताप,आणि रमेश आडसकर यांच्या तिरंगी लढती च्या विभाजनात अपक्ष बाजी मारण्याची शक्यता बळावली आहे…

दुसरी घटणा आहे परळी मतदार संघातील परंतु पहिल्या घटणेशी सख्ये साम्य आसलेली कांग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री पंडितराव दौंड हे देखील गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर विरोधक होते आणि आहेत या घराण्या बद्ल परळी परीसरातील जनतेच्या मना मध्ये आदरयुक्त एक आगळे वेगळे स्थान आहे परंतु त्यांचे पुत्र संजय दौंड यांनी मागील 5 वर्षापुर्वी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वा खाली एकसंघ आसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेत विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतली होती मात्र आज त्यांनी घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांच्या मनातील धनंजय मुंडे यांच्या बद्दलची खदखद बोलुण दाखवली आसुण येणारी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे…

मिळाली तर तुतारी नाही तर अपक्ष या भुमीकतुन संजय दौंड परळी मतदार संघातुण निवडणूक लढणार हे निश्चीत झाले आसले तरी दोन दिवसात अंतिम निर्णय घेऊ आसे संजय दौंड म्हणालेत ! त्यामुळे परळी मतदार संघातील चित्र स्पष्ट न होता सस्पेन्स आणखी तानला गेला आहे,युती कडुण धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरुण हाबुक ठोकला आहे पण आघाडी कडुण आद्याप हि उमेदवाराची घोषणा होणे बाकी आहे त्यामुळे परळी मतदार संघातील चित्र स्पष्ट होताना दिसत नाही संजय दौंड यांच्या अंतिम  निर्णया नंतर अर्ज विड्रौल करण्याच्या अंतिम तारखे पर्यंत या मतदार संघातील परस्थितीवर भाष्य करणे हे थोडे  अपरिपक्वपणाचे ठरू शकते…

 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!