वेगवान मराठी
मुंबई, ता. 25 – भारत कृषीप्रधान देश असून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या शेतीला जोडधंदा म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी विविध व्यवसाय करत असतात. मात्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर शेतक-यांसाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. Farmers get bamboo within hours of Maharashtra results
जिओचा सर्वात स्वस्त इंटरनेट प्लॅान लॅान्च, तोही वर्षभराचा
महायुतीची सत्ता येताचं सोयाबीनचे दर उसळले
ऊन, वारा, पाऊस, दुष्काळ, गारपीट, आसमानी आणि सुलतानी संकट आणि शेतमालाचे अस्थिर असलेले बाजार यामुळे शेतकरी संकटात आहे. मात्र या संकाटामध्ये पुन्हा शेतक-यांवर एक संकट येऊन उभं ठाकले आहे. शेतक-यांच्या बाबतीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याचा परिणाम आर्थिक स्वरुपात शेतक-यांना सोसण्याची वेळ येणार आहे.
दुध संघाने गाई दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त दूध उत्पादनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दूध संघाने देखील गाईच्या दुधाच्या खरेदी दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुग्ध व्यवसाय हा महाराष्ट्रातील शेतीशी संबंधित जोडव्यवसाय असल्याने याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसणार आहे.
महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने सात रुपयांचा अनुदान जाहीर केलेलं आहे. आणि जर आपला दुधाचा दर पहायचा असेल तर 28 रुपये प्रति लिटर दूध खरेदीचा आहे.
दूध संघटनेच्या कोल्हापूर विभागातील डेअरी प्रमुखांची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार खाजगी व सहकारी दूध संघाचा गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर 30 रुपये करण्यात आहे आहे. दूध भुकटी, लोणी, दुधाचे बाजारातील खरेदी विक्रीचे दर याबाबत बैठकीत सखोल चर्चा झाली. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा ऑक्टोबरपासून गाय दूध खरेदीचा 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ करीता किमान प्रतिलिटर दर 28 आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात इतर संघ 27 ते 28 रुपये अश्या दराने गाय दूध खरेदी करत आहेत.
नवीन निर्णयानुसार, 3.5% फॅट आणि 8.5% SNF असलेल्या गाईच्या दुधाची किंमत ₹33 वरून ₹30 प्रति लिटर करण्यात आली आहे. हा निर्णय झालेल्या बैठकीत राजारामबापू दूध संघ, गोकुळ दूध संघ, वारणा दूध संघ, भारत डेअरी आणि इतर दुग्ध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महायुतीची सत्ता येताचं सोयाबीनचे दर उसळले
या निर्णयाला दूध उत्पादकांकडून तीव्र विरोध होण्याची दाट शक्यता असून, ते कमी केलेल्या दरांच्या बाजूने नसतील.