विधानसभेत माघार घेतली नाही, आता तुझा मेंदु काढून घेणार

वेगवान मराठी
नाशिक, ता. 29
येवला विधानसभा मतदार संघातून उमेदवारी केलेले भागवतराव सोनवणे यांना प्रतिस्पर्धी उमेदवाराचा समर्थक व ठेकेदार याने उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
यश पदरात पाडून घेऊण अमित शहांनी केली एकनाथ शिंदेंची बोळवण
तुझा मेंदू काढून घेणार, डोळे काढून घेणार, हात पाय तोडून टाकणार, कुटुंबातील इतर सदस्यांना देखील जिवंत ठेवणार नाही अशी धमकी फोन वरून अक्षय तांदळे वय 35 रा. कोटमगाव बुद्रुक याने दिली आहे.
कांद्याचे दरामध्ये झाला मोठा बदल
मतदानाच्या दिवशी ही अशाच प्रकारची धमकी अक्षय तांदळे याने दिली होती, येवला शहर पोलिसांनी समज देऊनही पुन्हा तांदळे याने उमेदवार भागवतराव सोनवणे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्याच्यावर भारतीय न्याय संहिता 351(2) व भारतीय न्याय संहिता 351(4) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
ऐश्वर्या राॅयचा मार्ग घटस्पोटाच्या दिशेने ! आडनाव हटविले
पुढील तपास येवला शहर पोलीस निरीक्षक महाजन यांचे मार्गदर्शना खाली हेड कॉन्स्टेबल हेम्बाडे करत आहेत.
शेतक-यांसाठी मोदी सरकारी नवी योजना, 20 हजार रुपये मिळणार
मनमाड चे पोलीस उप विभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी दखल घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
