शेती

मोठी बातमी-शेतकऱ्यां साठी फार्मर आयडी झाली आवशयक

Farmer ID card has become mandatory for farmers.

अँग्रिस्टॅक’ अंतर्गत पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक

 पिएम किसान सन्मान योजनेसह शेतकऱ्यां साठीच्या राबविण्यात येणाऱ्या इतर योजनांसाठी फार्मर्स आयडी असणे आवश्यक झाले !

बीड, दि. 22 (वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड ):- महाराष्ट्र राज्याच्या जमाबंदी आयुक्तालय आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक व वेळेवर मिळवून देण्यासाठी ‘अँग्रिस्टॅक’ योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतांची माहिती संकलित करणे आणि त्या माहितीच्या आधारे सरकारी योजनांचे कार्यान्वयन अधिक प्रभावी व सुलभ बनवणे आहे.

राज्यातील कृषिक्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरीत्या शेतकऱ्यांना लाभ देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे.

शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला असून ‘अँग्रिस्टॅक’ अंतर्गतच पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे .

पीएम किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थी यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘अँग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी गरजेची आहे. तरी शेतकऱ्यांनी विनाविलंब ‘अँग्रिस्टॅक नोंदणी करून घ्यावी

जेणेकरून कोणताही पात्र शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे.

✒️वेगवान मराठी न्युज नेटवर्क महाराष्ट्र केशव डी मुंडे 8888 387 622 जाहिराती साठी संपर्क साधा 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!