बीड
निजामकालीन घाटनांदूर रेल्वे प्रश्नी खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट
BEED districts train stop ISSUE at ghatnandur

- वेगवान मराठी परळी-बीड दि १८ डिसेंबर 2024
- जलदगती रेल्वेला घाटनांदूर रेल्वेस्थानकावर थांबा द्या खा.बजरंग सोनवणे यांनी दिले केंद्रीय मंत्र्यांना पत्र
बीड: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर रेल्वेस्थानकावर जलद गती रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची लेखी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतिषकुमार यांच्याकडे केली आहे.अंबाजोगाई तालुक्यातील सर्वात मोठे व निजामकालीन असे हे रेल्वेस्थानक असून निजामकाळापासून सुरू असलेल्या संभाजीनगर-हैद्राबाद पॅसेंजर रेल्वेचे कोविडकाळात एक्स्प्रेस रेल्वेत रुपांतर करण्यात आले. कोरोनाच्या अगोदर नांदेड-बंगलोर या एक्स्प्रेस रेल्वेला असलेला घाटनांदूर रेल्वेस्थानकावरील नियमीत थांबा कोरोना काळात बंद करण्यात आला. ह्या दोन्ही रेल्वे घाटनांदूर रेल्वेस्थानकावर थांबत नसल्याने परिसरातील रेल्वे प्रवाशांना हैद्राबाद, बंगलोर जाण्यासाठी परळी रेल्वेस्थानकावर जावे लागत आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. संभाजीनगर ते हैद्राबादऐवजी संभाजीनगर ते गुंटूर जलद रेल्वेमध्ये रुपांतर केले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी औरंगाबाद-गुंटूर, नांदेड-बंगलोर, बँगलोर नांदेड, नांदेड बँगलोर, नांदेड-पनवेल, पनवेल नांदंड या जलदगती रेल्वेला घाटनांदूर स्थानकावर थांबा देण्याची मागणी यांनी केली आहे. या मागणीला वैष्णव यांनी व श्री. सतिषकुमार, चेअरमन, रेल्वे बोडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सोनवणेंनी सांगितले.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.